महाराष्ट्राने कोविड संकटाचा मुकाबला करण्यास अग्रस्थानी – हायकोर्टाने राज्य सरकारची पाठ थोपटली

मुंबई – राज्यातील कोरोना महासाथीच्या संकटाचा सामना करण्यास महाराष्ट्र अग्रस्थानी राहिला असे आम्ही जाहीरपणे सांगू शकतो असे हायकोर्टाने म्हटले. विरोधकांकडून टीका होत असताना हायकोर्टाने मात्र कौतुक केले आहे. मुंबई हायकोर्टात कोरोनाकाळातील विविध समस्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले. आम्ही हे जाहीरपणे सांगू शकतो की, महाराष्ट्र कोविड 19 चा मुकाबला करण्यात अग्रस्थानी राहिला आहे. आपण ते वाईट दिवस आता विसरायला हवेत असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांनी म्हटले. दरम्यान, कोरोनाकाळातील विविध समस्यांबाबत दाखल याचिका हायकोर्टाने निकाली काढल्या. मुंबईसह राज्यातील रूग्णालयातील खाटांची कमी संख्या, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा अपुरा साठा, लसीकरणातील समस्या, जेष्ठ नागरीकांना भेडसावणार्‍या समस्या यासारख्या समस्यांवर बोट ठेवत स्नेहा मरजादी यांच्यासह अन्य काहीजणांनी मुंबई उच्च न्यायालयात विविध जनहित याचिका दाखल केल्या होत्या. याआधीदेखील हायकोर्टाने काही याचिकांवरील सुनावणीत राज्य सरकार, मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते. तर, काही वेळेस कठोर निर्देश देत प्रशासनाला सूचनाही केल्या होत्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा