प्रभाग 5 मधील प्रेमदान हडकोतील अंतर्गत पॅचिंग व कॉंक्रीटकरणास प्रारंभ

अहमदनगर – नगरसेविका आशाताई शिवाजी कराळे यांच्या प्रयत्नातून व भाजपा शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक भैय्या गंधे, नगरसेवक मनोज दुलम, नगरसेविका सोनाबाई शिंदे यांच्या सहकार्याने प्रभाग पाचमधील प्रेमदान हाडकोतील अंतर्गत पॅचिंग व कॉंक्रीटकरणास प्रारंभ करण्यात आला. भाजपा शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक भैय्या गंधे, नगरसेविका आशाताई कराळे, नगरसेवक मनोज दुलम, नगरसेविका सोनाबाई शिंदे, तायगा शिंदे, शंकरराव जाधव, आप्पा खताडे, तुकाराम गोरडे, सतीष मुंडलीक, अजय राउत, बाळासाहेब कडुसकर, लाखे काका, कोल्हे मावशी, गारडे ताई, जगताप ताई, जगदाळे ताई, भांड ताई, उदय कराळे, सय्यद इस्माईल, गौरव जाधव, अभिषेक तांबे, शुभम भगत, सोनू तुपे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात नगरसेविका आशाताईं कराळे यांनी प्रभागाचा विकास कसा होईल याकडे सातत्याने आम्ही सर्व नगरसेवक लक्ष देत असतो त्या माध्यमातून प्रभागात काम करत असतो. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा