धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून नगरवासियांनी मनोरांजन नगरीचा आनंद घ्यावा-आमदार संग्राम जगताप

क्राफ्ट इंडिया शॉपिंग फेस्टिवल व मनोरंजन नगरीचा शुभारंभ

(छाया – लहू दळवी,अहमदनगर)

अहमदनगर – कोरोनाच्या महाभयंकर संकटाने गेल्या दोन वर्षापासून माणूस माणसापासून दूर गेला आहे. हा विषाणू संसर्गजन्य विषाणू असल्यामुळे शासनाचे विविध निर्बंध नागरिकांना घालण्यात आले आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कुठलाही कार्यक्रमाला जात आले नाही आता निर्बंध उठल्यानंतर नागरिकांना शॉपिंग, मनोरंजनाचे खेळ आदी कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून नगरवासियांनी मनोरांजन नगरीचा आनंद घ्यावा.

कल्याण रोड वरील जाधव पेट्रोल पंपाजवळ क्रॉफ्ट इंडिया शॉफी व मनोरंजन नगरी उभारण्यात आली आहे याच्या माध्यमातून नगरकरांना कोरोनामध्ये गेलेल्या तणावपूर्वक वातावरणातून बाहेर येण्यासाठी मदत होईल, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले. कल्याण रोडवर जाधव पेट्रोल पंपाजवळ उभारण्यात आलेल्या क्रॉफ्ट इंडिया शॉफी व मनोरंजन नगरीचा शुभारंभ आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी रोहित सोनवणे, जोसेफ अँथनी, नाना नगरे, संतपाल, वैभव वाघ, संतोष लांडे, युनूस शेख तसेच आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना रोहित सोनवणे म्हणाले की, क्राफ्ट इंडिया शॉपिंग फेस्टिवल व मनोरंजन नगरीच्या माध्यमातून नगरवासियांना आपला आनंद द्विगुणित करता येणार आहे. याचबरोबर लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत असणार्‍यांना या फेस्टिवलचा आनंद लुटता येणार आहे. यामध्ये हस्तकेलेने तयार केलेल्या शोभेच्या वस्तू, गृहउपयोगी वस्तू, जेन्ट्स-लेडीज कपडे, राजस्थानी फर्निचर आदी वस्तू या फेस्टिवलमध्ये उपलब्ध आहेत. याबरोबर लहान मुलांसाठी मनोरांजन नगरीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नगरकरांनी या फेस्टिवलमध्ये सहभाग नोंदवावा, असे ते म्हणाले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा