आचार्य आनंदॠषिजींची 108 वी दीक्षा जयंती सजोडे जाप करुन साजरी

अहमदनगर- रविवार 12 डिसेंबर राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदॠषिजी म. सा. यांची 108 वी दीक्षा जयंति निमित्त सकाळी आठ ते नऊ या वेळेत आनंदधाम येथे 1008 सजोडे जाप व 108 युवक युवती जापचे सुंदर आयोजन श्रावक संघाच्या वतीने करण्यात आले. महाराष्ट्र प्रवर्तक श्री कुंदनॠषिजी म. सा., प्रबुद्ध विचारक श्री आदर्शॠषिजी म. सा., स्थविरा महासती श्री विमलकुंवरजी म सा आदि समस्त साधू साध्वींच्या पावन सानिध्यात सजोडे जाप झाला. गुरुदेवांचे अधिकतम वास्तव्य अहमदनगर मध्ये असल्यामुळे आनंदधाम हे एक उर्जाचे स्थान बनले आहे. गुरुदेवांचा दीक्षा दिवस येथून पुढे संयम व अनुशासन दिवस म्हणून प्रती वर्ष साजरा करण्यात येईल. गुरुदेव नेहमी जाप करत, जाप केल्याने पाप ताप व संताप दुर होतात असे नेहमीच म्हणत. परमेश्वराचे नामस्मरण आत्मशांती करीता व आरोग्य साठी चांगला असून याची आज खुप गरज आहे असे प्रबुद्ध विचारक श्री आदर्शॠषिजी म सा म्हणाले. आजचा हा सामूहिक सजोडा जाप यशस्वी करण्यासाठी अहमदनगर श्रावक संघाने तसेच आलोकऋषि व ज्योत्सनाजी म सा यांनी परिश्रम घेतले.

आचार्य आनंदॠषिजींचे कार्य जैन समाजासाठी आदर्शवत आहे. वयाच्या तेराव्या वर्षी दीक्षा व्रत अंगीकार केल्यानंतर त्यांनी आत्मसात केलेले अमूल्य ज्ञान आपल्या सर्व शिष्यांना व धर्मप्रेमी बंधू-भगिनींना दिले आहे. त्यांचे स्नेह मार्गदर्शन श्रमण संघास मिळाले आहे. संपूर्ण भारतभर विहार करत त्यांनी भगवान महावीर स्वामीजींनी दाखविलेल्या ज्ञान दर्शन चारित्र्य तप जप आणी त्याग या विषयावर प्रवचन देऊन आपले जीवन कृतार्थ केले आहे. त्यागातच खरे सुख आहे, वैराने वैरच वाढते त्यातून निर्माण झालेले प्रश्न जीवन दु:खी करते. मानव जन्म अनमोल आहे. जीवन सुखमय होण्याकरिता धर्म साधना, आराधना, तप, जप करावेत असे ते नेहमी सांगत. गुरुदेवांचा आपल्या जैन समाजास मिळालेला सहवास फक्त नगर शहरातच नाही तर पुर्ण जिल्ह्यात, राज्यात, देशभरात अनेक जण त्यांच्या कार्याचे सतत गुणगान करत असतात. आचार्य आनंदॠषिजी महाराज हे खरोखर महान संत होते. त्यांचे विचार नेहमीच प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रवर्तक श्री कुंदनॠषिजी म. सा. यांनी केले.

जाप निमित्ताने उपस्थित सर्वांचे विशेष स्वागत अभिनंदन व्यक्त करून श्रावक संघाचे सह सेक्रटरी नितीन कटारिया म्हणाले साधू-साध्वीजींच्या सानिध्यात व त्यांच्या प्रेरणेतून आपल्या दिनचर्येत अनेक बदल होतात व यातून जागृत होऊन जीवनात येणार्‍या अनेक समस्यांवर मात करण्याचे योग्य समाधान मिळते. आज त्यांच्या 108 व्या दीक्षा जयंति निमित्त श्रावक संघाने उपस्थित समस्त साधू साध्वींच्या प्रेरणेतून सजोडे जाप चे आयोजन करून आचार्य श्रीजींच्या प्रति विशेष श्रद्धा सुमन अर्पण करून धन्य धन्य वाटले. सजोडा जापमध्ये सहभाग घेणार्‍या भक्तांतील 108 भाविकां करिता श्रीमती कमलाबाई हस्तिमल मुनोत परिवार निंभारीवाला यांच्या वतीने लक्की ड्रॉ गिफ्ट वाटप करण्यात आले. युवक युवती जाप मध्ये सहभाग घेणारे युवक युवतींना सुनील मुनोत नेवासकर परिवार यांच्या वतीने गिफ्ट वाटप करण्यात आले. उपस्थित सर्वां करिता श्री आनंद धर्म महिला मंडळ व शांती केंद्र महिला मंडळ यांच्याकडून नवकारशी व्यवस्था केशर गुलाब मंगल कार्यालय येथे करण्यात आली. या जाप निमित्ताने लाभ घेणार्‍या लाभार्थींचा सत्कार सन्मान श्रावक संघाच्या पदाधिकार्‍यांकडून करण्यात आला. आचार्य आनंदॠषिजींच्या दरबारात एक भव्य आत्मा दीक्षा व्रत अंगीकार करणार आहेत. गुरुदेवांचे सुशिष्य खांदेश शिरोमणी उप प्रवर्तक श्री अक्षयॠषिजी म. सा. यांच्या सानिध्यात महाराष्ट्र प्रवर्तक पू श्री कुंदनॠषिजी म. सा. यांच्या मुखारविंदाने भावदीक्षित गौरव मुकेशजी संचेती यांचा जैन भगवती दीक्षा समारोह रविवार 6 फेब्रुवारी 2022 रोजी आनंदधाम, अहमदनगर च्या पावन प्रांगणात होणार आहे. यावेळी श्रावक संघाचे उपाध्यक्ष आनंदराम मुनोत, सतीश लोढा, सेक्रेटरी संतोष बोथरा, संतोष गांधी, अभय लुनिया, प्रीतम गांधी, नितीन शिंगवी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा