चिमुरडीचा ‘वाचन विक्रम’

‘ग्रंथ हाच गुरू’ असे आपल्याकडे म्हटले जाते. शिवाय पुस्तकांसारखा सोबती, मित्रही दुसरा नाही. त्यामुळे लहानपणीच वाचनाची आवड लागली तर तिचा आयुष्यभर उपयोग होत असतो. संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणार्‍या एका भारतीय चिमुरडीने तर आता पुस्तक वाचनाचा विक्रमच केला आहे. पाच वर्षांच्या किआरा कौर नावाच्या मुलीने दोन तासांमध्ये तब्बल 36 पुस्तके वाचली! किआराने न थांबता 105 मिनिटे किंवा दोन तासांमध्ये 36 पुस्तके वाचली. ती आपल्या कुटुंबीयांसमवेत संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहते. तिच्या नावाची नोंद आता लंडन वर्ल्ड बुक रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. अतिशय कमी वयातच किआरा वाचन शिकली व पुस्तकेही वाचू लागली. घरी असताना किंवा मोटारीमधून प्रवास करीत असतानाही तिला हातात पुस्तक हवे असे. पुस्तकांमधील रंगीत चित्रे आणि मोठी, टपोरी अक्षरे यामुळे मला पुस्तके आवडू लागली असे तिने सांगितले. तिच्या आवडत्या पुस्तकांमध्ये सिंड्रेला आणि ऍलिस इन वंडरलँडचा समावेश आहे. तिला तिच्या आजोबांमुळे पुस्तकांचा छंद लागला. तिचे आजोबा तिला नेहमी गोष्टी सांगत असतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा