एरोनॉटिक्स क्षेत्रात नवे पाऊल

देशातील एरोनॉटिक्स क्षेत्रात आता नवे पाऊल पडले आहे. नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरीजने (एनएएल) प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार्‍या ‘हंस’ विमानाचे नवे रूप ‘हंस-एनजी’ विकसित केले आहे. या वर्षअखेरपर्यंत ‘हंस-एनजी’च्या उड्डाणाच्या चाचण्या सुरू होतील. ‘एनएएल’ हा ‘सीएसआयआर’शी निगडीत एक उपक्रम आहे. ‘हंस-एनजी’बाबत उड्डयन क्षेत्रात नवा उत्साह दिसून येत आहे. ‘एनएएल’चे संचालक जितेंद्र जाधव यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, वेगवेगळ्या फ्लाईंग क्लब्सकडून आम्हाला सुमारे तीस पत्रे आधीच मिळालेली आहेत. ही पत्रे या विमानाच्या गुणवत्तेवर मोहोर लावणारी आहेत. ‘हंस-एनजी’ मधील ‘एनजी’चा अर्थ ‘न्यू जनरेशन’ असा आहे. ‘हंस’ विमानाच्या प्रोटोटाईपने 1993 मध्ये उड्डाण करणे सुरू केले होते. कडक चाचण्यांनंतर त्याला सन 2000 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. 2000 ते 2007 पर्यंत ‘एनएएल’ने बारा ‘हंस’ विमाने विकसित करून त्यांना विविध फ्लाईंग क्लबना उपलब्ध करून दिले. या विमानांनी हजारो तास आकाशात घालवली आहेत. आयआयटी कानपूरजवळील उपलब्ध विमान तर हवेत चार हजार तास घालवल्यानंतरही सक्रिय आहे. आता त्याची ही नवी सुधारित आवृत्ती तयार करण्यात आली आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा