फिलीपाईन्समध्ये आढळले रहस्यमय किडे

फिलीपाईन्सच्या इलोकोस सूर प्रांतातील समुद्रकिनार्‍यावर लाखो रहस्यमय किडे पाण्यातून वाहून बाहेर आले. तिथे खेळत असलेल्या मुलांनी सर्वप्रथम हे अळ्यांसारखे दिसणारे किडे पाहिले. हे किडे निळसर, करड्या रंगाचे होते. समुद्रकिनार्‍यावर अनेक मीटर अंतरापर्यंत हे किडे उथळ पाण्यात वळवळत असताना दिसले. या किड्यांची लांबी सुमारे दहा इंच होती. या किड्यांना अनेक पायही होते, असे एका स्थानिक माणसाने सांगितले. तीन तासांनंतर हे किडे तेथून गायब झाले. तोपर्यंत समुद्रकिनार्‍याचे साफ पाणी काळसर दिसत होते. ही घटना 30 मार्चच्या सायंकाळी सुमारे सात वाजता घडली. त्यावेळी किनार्‍यावर काही मुलं खेळत होती व त्यांनी हे दृश्य आधी पाहिले. तेथील काही किडे पाण्यातून वाहून किनार्‍यावरही आले होते. हे किडे जसे अचानक दिसू लागले होते तसेच तीन तासांनंतर अचानक गायबही झाले. ते कुठे गेले हे समजले नाही असे कार्ल रोबोगिओ नावाच्या स्थानिक माणसाने सांगितले. रात्री दहा वाजता आम्ही या किड्यांची तपासणी करण्यासाठी आलो असता ते गायब झालेले आहेत असे दिसून आले, असे त्यांनी म्हटले आहे. काही लोकांनी हे किडे पकडले होते व ते तपासणीसाठी तज्ज्ञांकडे सोपवण्यात आले आहेत. हे किडे हानिकारकही ठरू शकत असल्याने त्यांना स्पर्श न करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा