तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी अहमदनगरचे उद्योजक सौरभ बोरा यांची नियुक्ती

देशभरातून 24 व्यक्तींना संधी- अहमदनगरला प्रथमच मिळाला मान

अहमदनगर- देशातील प्रतिष्ठीत आणि श्रीमंत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या आंध्रप्रदेशातील तिरुमला येथील तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी नगर मधील उद्योजक सौरभ हेमराज बोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या यादीमध्ये देशभरातून केवळ 24 व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली असून नगर शहराला हा मान प्रथमच मिळाला आहे. आंध्रप्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती देवस्थान देशातील सर्वात प्रतिष्ठित असे देवस्थान आहे. या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढाओढ लागलेली असते. यासाठी प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून ही नियुक्ती सुचवत असतात. यावेळी महाराष्ट्रातून या यादीत दोघांना संधी मिळाली आहे. यामध्ये सौरभ बोरा यांच्यासह शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

उद्योजक सौरभ बोरा हे मुळचे अहमदनगर शहरातील असून सध्या ते मुंबईत स्थायिक झालेले आहेत. नगर मर्चंट बँकेचे संस्थापक स्व. हेमराज बोरा व विद्यमान संचालिका श्रीमती प्रमिलाताई बोरा यांचे ते चिरंजीव आहेत. ते प्रायव्हेट इक्विटी ऍण्ड रियल इस्टेट इन्व्हेस्टर असून राही प्रॉपर्टीज् ऍण्ड लिजींग प्रा.लि., तनीश होम्स् ऍण्ड कन्स्ट्रक्शन्स् प्रा.लि., राखी प्रोजेक्टस् प्रा.लि., पेनान्स कमर्शियल्स् प्रा.लि., यश शेअर्स ऍण्ड स्टॉक्स् प्रा.लि. आदी संस्थांचे संचालक आहेत. मुंबईतील जुहू येथील इस्कॉन टेम्पलचे ते कार्यकारिणी सदस्य आहेत. याशिवाय जितो ऍपेक्सचे सदस्य आणि जैन ऍडमिनेस्ट्रेटीव्ह ट्रेडिंग फाऊंडेशन (जेएटीएफ) चे सदस्य व जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन (जीओ) चे चेअरमन आहेत. त्यांनी मुंबई-पुण्यासह अहमदनगर, नाशिक व नागपूर या मोठ्या शहरांमध्ये रियल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. एक यशस्वी उद्योजक होण्याबरोबरच सामाजिक व धार्मिक कार्यातही त्यांचा सातत्याने सहभाग असतो. या कार्याची दखल घेऊन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी त्यांची ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. उद्योजक सौरभ बोरा यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या देवस्थानावर विश्‍वस्त म्हणून निवड होण्याचा मान नगर शहराला प्रथमच प्राप्त झाला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा