झोपडी कॅन्टीन समोरुन बुलेटची चोरी

अहमदनगर- शहरातील झोपडी कॅन्टीन परिसरात असलेल्या ओमकार कॉर्नर समोर लावलेली रॉयल इन्फिल्ड कंपनीची बुलेट (क्र.एम.एच.16, सी.पी.8180) अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना बुधवारी (दि.15) सकाळी 10.30 ते दुपारी 2 या कालावधीत घडली. याबाबत गणेश लक्ष्मण घाडगे (रा.दत्तवाडी मळा, कापूरवाडी, ता.नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.क. 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा