भव्य खड्डा फोटो स्पर्धेला नगरकरांचा मोठा प्रतिसाद

अहमदनगर – नगरकर सध्या सर्वात मोठ्या त्रासातून जात आहेत गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या राक्षसाचा सामना करत करत प्रशासन निर्मित राक्षसाला देखील तोंड देण्याची वेळ नगरकरांवर आलेली आहे. मनविसेने जी स्पर्धा आयोजित केली आहे ही फक्त स्पर्धा नसून प्रशासनाच्या नाकर्ते पणाचा प्रदर्शन प्रशासनालाच दाखवण्यासाठी जनतेने घेतलेला पुढाकार आहे. महापालिका आपली जबाबदारी प्रत्येक गोष्टीतून झटकताना दिसत आहे. सर्व सामान्यांना पायाभूत सुविधा जर मिळत नसतील तर हे प्रशासन, महापौर, आमदार, खासदार, नगरसेवक हे काम काय करतात, असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. गेल्या दोन दिवसापासून मनविसेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून 1100 पेक्षा जास्त फोटो आमच्याकडे आलेले आहेत. यापैकी काही फोटोंना नगरकरांनी मोठ्या तळमळीने तळतळ करून ईजा आणि दुखापतीतून या खड्ड्यांचे फोटो पाठवले त्यांना आयुक्तांना सामोरे जावे लागणार आहे. आयुक्तांच्या हस्ते असे काही बक्षीस देण्यात येईल की आयुक्तांनी तात्काळ रस्त्यांच्या डागडुजीला पुढाकार घेतला पाहिजे हा प्रामाणिक प्रयत्न आहे. अजून दोन दिवस ही स्पर्धा चालणार आहे. जनतेने यामध्ये सहभाग घ्यावा व आपापल्या भागातील प्रभागातील फोटो 9657457661 या व्हाट्सऍप नंबरवर पाठवावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा