श्री गणेश विसर्जन दिनी नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करा-आयुक्तांच्या प्रशासनाला सूचना

अहमदनगर – श्री गणेश विसर्जन दिनी शहरातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्या, अशा सूचना आयुक्त शंकर गोरे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. मंगळवारी 14 सप्टेंबर रोजी आयुक्त सभा कक्ष येथे गणेशोत्सव विसर्जन दिनी महानगरपालिकेच्या वतीने करावयाच्या कार्यवाहीबाबत बैठक झाली. सदर बैठकीस आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त श्रीनिवास कुरे, यशवंत डांगे तसेच खाते प्रमुख व शाखा प्रमुख उपस्थित होते.

सुरुवातीस शहर अभियंता यांनी मागील वर्षी मनपाने केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. तसेच यावर्षी करावयाचे कार्यवाहीबाबत चर्चा झाली. तसेच या बैठकीत पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सर्व विसर्जन विहिरीचे ठिकाणी बॅरेकटींग व्यवस्था करणे, इतर ठिकाणी कृत्रिम हौदाची व्यवस्था करणे, विसर्जन केलेल्या गणेश मुर्तीची दरवर्षीप्रमाणे विल्हेवाट लावणेत यावी विसर्जनाचे ठिकाणी निर्माल्य जमा करणेचे ठिकाणी बॅनर लावणेत यावे. इलेक्ट्रिक विभागाने विसर्जनाचे दोन्ही विहीरीचे ठिकाणी जनरेटर, हॅलोजन तसेच इतर ठिकाणी पुरेशी विद्युत व्यवस्था उपलब्ध करुन देणे. प्रत्येक ठिकाणी वायरमन उपस्थित ठेवणेत यावेत. दुर्घटना घडु नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणेबाबत वायरमन यांना सुचना द्याव्यात. घनकचरा व्यवस्थापन विभागाने विसर्जनाचे सर्व ठिकाणी निर्माल्य संकलीत करणेसाठी बैठकीत दिलेल्या सुचनेनुसार व्यवस्था करण्यात यावी व जमा झालेले निर्माल्य तातडीने उचलणेची कार्यवाही करावी. विसर्जनाचे सर्व ठिकाणी साफसफाई करणेत यावी. यासाठी वापरण्यात येणारी वाहने स्वच्छ ठेवणेत यावीत. पाणीपुरवठा विभागाने कृत्रिम हौदाचे ठिकाणी टँकरद्वारे पाणी टाकण्याची व्यवस्था करावी. विसर्जनाचे ठिकाणी प्रभाग समितीकडील कर्मचार्‍यांच्या नेमणुका कराव्यात व या टिमवर प्रभाग अधिकारी यांनी नियंत्रक म्हणुन काम पहावे. सकाळी 7 पासुन रात्री 10 वाजेपर्यंत शेवटचे गणपतीचे विसर्जन होईपर्यंत थांबणेबाबत सुचना द्याव्यात. उद्यान विभागामार्फत विसर्जन स्थळाचे आजुबाजुचे परिसरातील, झुडपे, गवत काढणेची कार्यवाही करण्यात यावी. अग्निशमन विभागाने विसर्जन स्थळी विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास त्यांचेकडील लाईट टॉवर, टॉर्चची व्यवस्था करावी. तसेच लाईफ जॅकेट, प्रशिक्षित कर्मचारी यांच्या नेमणुका कराव्यात. आरोग्य विभागाने विसर्जन स्थळी फिरता दवाखाना वाहन तसेच आवश्यक प्रथमोपचार साहित्य तयार ठेवावे. मेडिकल ऑफिसर व नर्सेस याची नेमणुक करावी. स्टोअर विभागाने आवश्यक साहित्य, औषधे, प्लॅस्टीक कागद मागणीनुसार उपलब्ध करुन द्यावे. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार संबंधीत विभाग प्रमुखांनी नोंद घेवुन आपसात समन्वय ठेवुन आपली जबाबदारी पार पाडावी व कोणत्याही प्रकारे तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे मनपाने म्हटले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा