पुराणातला व प्राचीन जागृत ‘पालीचा’ बल्लाळेश्वर

गणेशपुराण व मुद्गल पुराणात उल्लेखित हा एक महत्त्वाचा अष्टविनायक. प्राचीन काळापासून जागृत. या स्थानावरूनच पेशवेकाळात कौल लावून न्यायनिवाडे होत. बल्लाळ नामक लहान मुलाच्या निरागस भक्तीवर संतुष्ट होऊन श्रीगणेश हे त्या मुलाने पूजलेल्या शिळेत येऊन राहिले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या शुभकामना पूर्तीचा गणरायाचा आशीर्वाद आहे. माघातील शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणेश जन्माला विनायकी चतुर्थीला श्री गजानन मध्यरात्री प्रत्यक्ष येऊन भोजन करतात अशी श्रद्धा असल्याने या दिवशी भक्तांची विशेष गर्दी होते व अनेकांचा तसा अनुभवही आहे.

पाली क्षेत्रात प्रवेश केल्यावर प्रथम छोटेसे बल्लाळेश्वर मंदिर लागते. त्यात बल्लाळावर प्रसन्न झालेली भव्य मूर्ती आहे. तिला ‘ढुंढीराज विनायक’ म्हणतात. ही स्वयंभू मूर्ती आहे. त्यानंतर दुसरे मोठे मंदिर बल्लाळेश्वराचे असून ते रमणीय असून त्याचे मुख पूर्वेकडे आहे. सूर्योदय होताच किरणं सभामंडपातून मूर्तीवर पडतात. गाभार्‍यातील ही मूर्ती रुंदट असून बेंबी व डोळ्यांत चकचकीत हिरे चमकतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा