मुलांमध्ये स्टेज डेरिंग व आत्मविश्वासासाठी गणेशोत्सवातील स्पर्धा चालू राहिल्या पाहिजे-आ. संग्राम जगताप

अहमदनगर- गणेशोत्सवात होणार्‍या विविध छोट्या मोठ्या स्पर्धांमुळे मुलांमध्ये स्टेज डेरिंग व आत्मविश्वास वाढत असतो. त्यामुळे भविष्यात कोणत्याही संकटाला तोंड देण्याचे सामर्थ्य मुलांमध्ये येते. मात्र गणेशोत्सव साजरा करताना अशा स्पर्धांचे प्रमाण कमी होत चालले आहे. गणेशोत्सवात होणार्‍या स्पर्धा चालू राहिल्या पाहिजे. शहरातील जुन्या अपार्टमेंट पैकी एक असलेल्या गोवर्धन अपार्टमेंटमध्ये चांगले कौटुंबिक वातावरण असून गणेशोत्सवातील स्पर्धांची परंपरा येथे जपली जात आहे. गोवर्धन अपार्टमेंट हे अहमदनगरमधील गोकुळधामच आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

गणेशोत्सवानिमित्त माळीवाडा जवळील गोवर्धन अपार्टमेंट मध्ये आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती करण्यात आली. गणेशोत्सवा निमित्त येथे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरणही त्यांनी केले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सचिन चंगेडिया, सुरज गांधी, अजित शिंगवी, प्रीतम बोगावत, वृषभ डागा, अक्षय गांधी आदींसह अपार्टमेंट मधील रहिवासी उपस्थित होते. यावेळी सचिन चंगेडिया यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. गोवर्धन अपार्टमेंट मधील सर्व रहिवासी हौशी असल्याने सर्व सण उत्सव येथे मोठ्या उत्सवात साजरे करण्यात येतात. मुलांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी दरवर्षी विविध स्पर्धा घेतल्या जातात. यावेळी किशोर लुणीया, जितेंद्र खीवंरसा, ऍड. मेहेर, श्री. जानोरकर, दीपक नय्यर, महेश भळगट, निलेश चोरबेले, रसिक गांधी, सचिन देसार्डा, राजेंद्र गांधी व नागरिक उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा