अहमदनगरमधील चित्रकार कलाशिक्षक योगेश हराळे यांना आर्ट बिट्स महाराष्ट्र कला सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

अहमदनगर – अहमदनगर मधील ऐतिहासिक वास्तूंच्या जतन व संवर्धना साठी ऐतिहासिक वास्तूंची जलरंगात चित्र रेखाटून प्रदर्शन आयोजन व चित्रांच्या माध्यमातून ऐतिहासिक वास्तूंचे महत्व सर्वसामान्यांपर्यंत व प्रशासनापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या कार्यासाठी यासाठी हराळे यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वीही हराळे यांना महाराष्ट्र शासनाचा पर्यटन मित्र हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच दुबई, युरोप, दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनात चित्र प्रदर्शित झाली आहे. कॅनडा येथील गावा या संस्थेचा अमंग द बेस्ट हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या चित्राला मिळाला आहे.

अहमदनगरमधील ’स्नेहालय’ या सामाजिक संस्थेत चित्रकलेचे विविध उपक्रम राबवत असतात. न्यु इंग्लिश स्कूल वाकोडी येथे कलाशिक्षक म्हणून काम करत असतांना विद्यार्थ्यांकडून पर्यावरण पुरक मखर, आकाशकंदील यासारखे उपक्रमाचे आयोजन हराळे करतात. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे महाराज पंढरपूर, आ. संग्राम जगताप, आ. निलेश लंके, स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, ऍड. श्याम आसावा, ऍड दिपक धिवर, न्यु इंग्लिश स्कूल वाकोडीचे सचिव आबासाहेब शरदराव तोडमल, मुख्याध्यापक चंद्रकांत काळे, सर्व शिक्षक, वाकोडीचे ग्रामस्त, ’स्वागत अहमदनगर’ यांनी अभिनंदन केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा