अवयव दान ही चळवळ अधिक व्यापक होणे गरजेचे-ॲड.अभय आगरकर

श्री विशाल गणेश देवस्थान येथे अवयव दान संकल्प अर्ज भरुन देण्याचा शुभारंभ

अहमदनगर – अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, ज्याद्वारे आपण मृत्यूनंतरही आपले अवयव दान करुन दुसर्‍याला जीवनदान देऊ शकतो. त्याचप्रमाणे अनेक रुग्णांचे प्राणही वाचवू शकतो. ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरुपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हा एक आशेचा किरण आहे. आपले शरीर हे नश्वर आहे, परंतु अवयव दानातून त्या व्यक्तीची स्मृती जिवंत ठेवू शकतो. अवयवदान ही चळवळ व्यापक होणे गरजेचे आहे. जालिंदर बोरुडे फिनिक्स फौंडेशनच्यावतीने अवयवदानाबाबत करत असलेली जागृती कौतुकास्पद आहे. या चळवळीत आपण सहभागी होऊन दुसर्‍यांचे प्राण वाचविण्यासाठी अवयव दानाचे संकल्प अर्ज भरुन दिले पाहिजे, असे प्रतिपादन श्री विशाल गणेश देवस्थानचे अध्यक्ष ॲड.अभय आगरकर ड.अभय आगरकर यांनी केले.

श्री विशाल गणेश मंदिर देवस्थान व फिनिक्स फौंडेशन यांच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त अवयव दान संकल्प अर्ज भरुन देण्याचा शुभारंभ ऍड. अभय आगरकर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, जिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक सतिष आहिरे, तुषार पोटे, देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, मंदार लोखंडे, श्रीकांत आंबेकर, गणेश राऊत आदि उपस्थित होते. याप्रसंगी जालिंदर बोरुडे म्हणाले, आज अनेक कारणाने मनुष्याचे अवयव निकामी होत आहेत, अशा परिस्थितीत मृत व्यक्तीने अवदान केल्यास अवयव गमावलेल्या व्यक्तींना पुन्हा जीवनदान मिळू शकते. यासाठी आपण आज संकल्प अर्ज भरुन दिल्यास आपल्या मृत्यूनंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या संमतीने ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. याद्वारे अनेक रुग्णांच्या जीवनात एक नवा आशेचा किरण निर्माण होऊ शकतो. ही चळवळ व्यापक करण्यासाठी फिनिक्स फौंडेशन कार्यरत आहेत. याप्रसंगी जिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक सतिष आहिरे यांनी अवयव दानाविषयी माहिती दिली. यावेळी मंदिर दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी अर्ज भरुन दिले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा