कल्याण रोड परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी

अहमदनगर- कल्याण रोड परिसरात रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या गणेशनगर भागात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा उपद्रव सुरू असून या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या भागात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. या संदर्भात भृंगमहाऋषी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी तसेच गणेशनगर परिसरातील नागरिकांनी तोफखाना पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, गेल्या 15 दिवसांपासून गणेशनगर भागात 7 ते 8 ठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. तसेच 3 मोटारसायकली रात्रीच्या वेळी चोरीला गेलेल्या आहेत. चोरट्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अनिल राऊत, गणेश शिंदे, निलम निघूट, शंभू जपकर, सुरेश मिसाळ, राजू वाळके, दत्तात्रय भापकर, राजेंद्र ताकपेरे यांच्यासह परिसरातील रहिवाश्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा