भिस्तबाग रोड ते सावेडी गावठाणला जोडणार्‍या रस्त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव द्यावे

बहुजन समाज पार्टीची मागणी, महापौरांना निवेदन

अहमदनगर – सावेडी उपनगरातील जुना भिस्तबाग रोड ते सावेडी गावठाणला जोडणार्‍या रस्त्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन महापौर रोहिणी शेंडगे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी संजय डहाणे, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, राजू भिंगारदिवे, संजय भिंगारदिवे, राहुल बरबडे, वैभव जाधव आदी उपस्थित होते. कुष्ठधाम रोडवरून जाणारा सावेडी पूर्व जुना भिस्तबाग रोड ते रासनेनगर ते सावेडी गावठाणास जोडणार्‍या रस्त्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाचे नांव देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच निवेदनावर स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा