कोरोनातून बर्‍या झालेल्या रुग्णाने केला डॉ. महांडुळे दाम्पत्य व कर्मचार्‍यांचा सत्कार

अहमदनगर – केडगावातील प्रणव हॉस्पिटलची उत्तम सेवा पाहून हॉस्पिटलचा नावलौकिक महाराष्ट्राभर पोहोचला. अहमदनगर जिल्हाच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातून पेशन्ट ऍडमिट होण्यासाठी येत आहेत. वर्षभरापूर्वी औरंगाबाद येथील रुग्ण या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यावेळी डॉक्टर आणि कर्मचार्‍यांनी चांगली सेवा दिली होती. ते आता ठणठणीत बरे झाले आहेत. त्यांनी कृतज्ञता म्हणून डॉ. प्रशांत व डॉ. शारदा महांडुळे आणि कर्मचार्‍यांचा औरंगाबाद लायन्स क्लबच्या वतीने फ्रंटलाइन वर्कर म्हणून सन्मानपत्र देत सत्कार केला. या अनपेक्षित सत्कारामुळे कर्मचार्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत औरंगाबादच्या एका कुटुंबाने हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यातील एक कुटुंब प्रमुख महेश धिमते हे औरंगाबाद लायन्स क्लबचे अध्यक्ष होते. ते व त्यांचे पुर्ण कुटुंब प्रणव हॉस्पिटलमध्ये औषधोपचाराने बरे झाले. त्यांची मुले आपल्या औषधोपचाराने घरीच क्वारंटाइन होऊन बरी झाली. कोरोना काळात डॉ. महांडुळे दाम्पत्य व कर्मचार्‍यांनी मनापासून नि:स्वार्थ सेवा दिली. ही बाब धिमते यांच्या लक्षात आली. त्यांनी अचानक सोमवारी प्रणव हॉस्पिटलला भेट देत औरंगाबाद लायन्स क्लबतर्फे प्रणव हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा आणि स्टाफचा सत्कार केला. कोरोना फ्रंटलाइन योद्धा म्हणून औरंगाबादचे लायन्स क्लबच्या सन्मानपत्राचे वितरण औरंगाबादचे लायन्स क्लबचे प्रशंसा पत्र आणि पुष्पगुच्छ शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री. सातपुते यांनीही हॉस्पिटलच्या रुग्णसेवेबद्दल कौतुक केले आणि प्रणव हॉस्पिटल हे फक्त केडगाव पुरतेच मर्यादित राहिले नाही. नगर जिल्हा आणि बाहेरच्या जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे केडगावच्या नावलौकिकात भर पडली आहे, असे सांगितले. कार्यक्रमास औरंगाबाद लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश धिमते, उद्योजक संजीव फळे, मंगेश फिसके, ऋषिकेश धिमते, ओंकार धिमते, योगेश्वर फळे आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा