ज्येष्ठ नागरिक संघ भिंगारची वार्षिक सभा खेळीमेळीत

भिंगार- भिंगार ज्येष्ठ नागरिक संघाची 14 वी वार्षिक सभा रविवार 5 रोजी सकाळी 11 वाजता संघाचे अध्यक्ष पोपटराव नगरे यांचे अध्यक्षतेखाली झाली.यावेळी इ. 10 वी व इ.12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रतिष्ठित व्यापारी बाळासाहेब शेकटकर आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक कारभारी आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांना भेटवस्तू, प्रशस्तीपत्रक व रोख बक्षीसे देवून सत्कार करण्यात आला. याचवेळी संघातील सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार पोपटराव नगरे, विवेक प्रभुणे, विठ्ठलराव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. वार्षिक सभेचे सर्व विषय खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर झाले. याचवेळी सन 2021-2024 साठी नवीन कार्यकारिणी विवेक प्रभुणे यांनी जाहीर केली.

नवीन कार्यकारिणीसाठी पोपटराव नगरे, विठ्ठलराव लोखंडे, विवेक प्रभुणे, सुभाष हौडगे, रमेश त्रिमुखे, सुरेश कानडे, आसाराम सोनसळे, विष्णुपंत कदम, डॉ. मधुकर शेरकर, अशोक पवार, कैलास बिडवे, प्रकाश तरवडे, सौ. मीराबाई आल्हाट, अशोक गलांडे, सुरेश उदारे या सर्वांची बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी बलभीम कांबळे यांनी रू.5005, कारभारी आव्हाड रू.5001, रमेश त्रिमुखे रू.1100, गजानन जोशी यांनी रू.1100 ची देणगी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकारी व निमंत्रीत सदस्यांनी मदत केली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा