कार्यक्षम कर्मचार्‍यांमुळे मर्चंटस् बँकेप्रती ग्राहकांमध्ये आपुलकीची भावना-प्रा. पी. डी. ऋषी

अहमदनगर- सध्या बँकिंग क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली आहे. या परिस्थितीत नगरमध्ये मर्चंटस् बँक हस्तीमल मुनोत यांच्या कार्यकुशल नेतृत्त्वाखाली अतिशय दर्जेदार व आपुलकीची बँकिंग सेवा देत आहे. आधुनिक, गतिमान, कार्यक्षम व्यवस्थापन या बँकेचे वैशिष्ट्ये आहे. बँकेचे कर्मचारी प्रत्येक ग्राहकाला आपुलकीने सेवा देतात. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना खूप आस्थेने सेवा दिली जाते. असे कार्यक्षम कर्मचारी व व्यवस्थापन यामुळे मर्चंटस् बँकेची प्रगती झाली असून ती भविष्यातही कायम राहिल, असा विश्वास बँकेच्या गुलमोहोर रोड शाखेचे ग्राहक व सभासद प्रा. पी. डी. ऋषी यांनी व्यक्त केला. बँकेचे जुने ग्राहक असलेले प्रा. ऋषी हे गुलमोहोर रोड शाखेचे जुने ग्राहक आहेत. त्यांच्या काही जुन्या मुदतठेवी संदर्भात प्रश्न निर्माण झाले होते. या प्रश्नांची अतिशय तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी बँकेतील महिला कर्मचारी प्रणाली कटारिया यांनी खूप मदत केली. प्रा. ऋषी यांचे वय लक्षात घेवून त्यांना तत्परतेने मदत करीत त्यांच्या समस्येची सोडवणूक केली. कटारिया यांच्या कार्यक्षमतेमुळे प्रभावीत झालेल्या प्रा. ऋषी यांनी बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तीमल मुनोत, संचालक तसेच सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांचा सन्मान केला.

यावेळी संचालक अमित मुथा, कमलेश भंडारी, बँकेचे ग्राहक अनिल जोशी, संजय पाटील, मुकेश मेहता, मयुर गांधी, शाखाधिकारी चंद्रकांत भागवत, कर्मचारी योगेश गुगळे, अक्षय गांधी, पवन कुंभारे, दीपा मेहता, विशाल गुगळे, स्वप्निल मेहेर, संतोष वाघमारे, सचिन गुंदेचा, लोकेश गांधी आदी उपस्थित होते. हस्तीमल मुनोत म्हणाले की, ग्राहक व सभासद केंद्रस्थानी ठेवून मर्चंटस् बँकेने सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. 50 हून अधिक वर्षांची या यशस्वी वाटचालीत अतिशय प्रामाणिकपणे व तळम ळीने काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचाही सिंहाचा वाटा आहे. कर्मचारी हे बँकेचा खरा चेहरा असतात. कारण त्यांचा थेट ग्राहकांशी संपर्क येत असतो. ग्राहकांकडून जेव्हा कर्मचार्‍यांचा असा सन्मान होतो तेव्हा आम्हालाही अभिमान वाटतो. प्रा. ऋषी यांनी केलेला हा सन्मान संपूर्ण मर्चंटस् बँक परिवाराचा सन्मान आहे. अशा सन्मानामुळे प्रत्येकालाच आणखी चांगले काम करण्याची, उत्तम सेवा देण्याची ऊर्जा नक्कीच प्राप्त होईल, असा विश्वास मुनोत यांनी व्यक्त केला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा