दधीची ऋषी जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर, वस्तूंचे वाटप

अहमदनगर – येथे त्यागमूर्ती महर्षी दधीची ऋषि जयंती, दधीची युवा मंचच्या वतीने सामाजिक बांधीलकी जपून साजरी करण्यात आली. यामध्ये दधीची युवा मंचच्या वतीने भजन संध्या, नामस्मरण व प्रसाद वाटप केले. निसर्गसृष्टी गौरक्षण संस्था येथे 150 गायींना 3 टन चारा खाऊ घालून गौ मातेची पूजा करण्यात आली. यानंतर जनकल्याण रक्तकेंद्र येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये दधीची युवा मंचच्या युवकांनी प्रतिसाद दिला. संध्येस सर्व युवा मंचच्या सदस्यांच्या वतीने व दधीची समाजाच्या वतीने सावली संस्थेतील अनाथ मुला मुलींना जेवण व आवश्यक वस्तू देण्यात आल्या. जसा महर्षी दधीची ऋषींनी आपल्या हाडांचा त्याग करुन बलिदान दिले. त्या पार्श्वभूमीवर वाटचाल करत युवा मंचच्यावतीने दधीची ऋषि जयंतीनिमित्त दिवसभर सामाजिक उपक्रम करुन आपले योगदान दिले. या कार्यक्रमासाठी अहम दनगर दधीची मंडल, महिला मंडल व समाजातील सर्व वरिष्ठ वर्गाचे मार्गदर्शन व सहयोग लाभले. अहमदनगर दधीची मंडल व युवा मंच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असते. दरवर्षी जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम करत असतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा