चिचोंडी पाटील गटात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

अहमदनगर – तालुक्यातील चिचोंडी पाटील गटातील आठवड, चिचोंडी पाटील, सांडवा, दशमी गव्हाण, टाकळी काजी, मदडगाव, मांडवा, उक्कडगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हरिभाऊ कर्डिले मित्र मंडळ व के. के.आय बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 17 सप्टेंबर रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मार्केट कमिटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक हरिभाऊ कर्डिले यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा