नव्या सुविधांसह कम्युनिटी हेल्थ सेंटरचे संचालन स्नेहालय करणार

अहमदनगर – 4 सप्टेंबर 2008 रोजी लार्सन ऍड टुब्रो कंपनी अहमदनगरतर्फे सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य गरीब व गरजू लोकांकरिता कंपनीचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक आर. सी. आगरवाल व डॉ. के. जे. कामत यांच्या हस्ते एल. ऍड टी. केंद्राचे (मोफत आरोग्य तपासणी) लोकार्पण झाले. कंपनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषभ फिरोदिया यांनी स्वास्थ केंद्राची जबाबदारी स्वीकारली. विविध तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत आरोग्य तपासणी सुरु झाली. त्यानंतर माजी मुख्य व्यवस्थापक के. के. शुक्ला यांनी ह्या स्वास्थ केंद्राचा गरिबांसाठी कसा फायदा होवू शकतो, यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले. त्यामध्ये ई.सी. जी., लॅब, फिजिओथेरपी असे अत्याधुनिक उपकरणे आली व त्यांच्या प्रयत्नांमुळे स्वास्थ केंद्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले.

2013 ते 2021 या कालावधीमध्ये स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अरविंद पारगांवकर यांनी या स्वास्थ केंद्रामध्ये 17 नावाजलेल्या तज्ञ डॉक्टरांची सेवा गरीब रुग्णांना करून देण्यात आली. डॉ. फिरोदिया यांनी अनेक प्रकारची आरोग्य शिबिरे आयोजित केली. त्यामुळे रुणांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. एल. ऍड टी. स्वास्थ केंद्र हे कॉरपोरेट सी.एस.आर. अंतर्गत चालविण्यात येणारे नगरमधील पहिले परिपूर्ण असे स्वास्थ केंद्र बनले. सप्टेंबर 2020 मध्ये जागतिक दर्जाची कंपनी श्नाइडर इलेक्ट्रिक ऍड ऑटोमेशनने या कंपनीचा कारभार हाती घेतला. अरविंद पारगांवकर यांनी स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फौंडेशनच्या अंतर्गत लार्सन ऍड टुब्रो स्वास्थ केंद्र सुरु ठेवले. सर्व सामान्य जनतेचे आरोग्याकरिता लार्सन ऍड टुब्रो स्वास्थ केंद्राचे नाव अहमदनगर कम्युनिटी हेल्थ सेंटर असे बदलण्यात आले हे स्वास्थ केंद्र चालविण्याकरिता नगरमधील प्रसिद्ध सामाजिक संस्था स्नेहालय या संस्थेची निवड करण्यात आली. प्रकल्प अंमलबजावणी करिता स्नेहालयने सहयोगी म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहे. 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नवीन स्वरूपातील अहमदनगर कम्युनिटी हेल्थ सेंटरचा शुभारंभ आयोजिण्यात आला आहे, अशी माहिती स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फौंडेशन कंपनीचे संचालक डायरेक्टर अरविंद पारगांवकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषभ फिरोदिया, स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष संजय गुगळे, सचिव राजीव गुजर आणि संचालक डॉ. सुहास घुले यांनी दिली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा