आहारवेद – आहारातून आरोग्य संवर्धन – काय खाणे टाळावे? (पांढरी विषे)

शाबुदाणा

शक्करकंदाच्या मुळ्यांमधून कंद काढले जातात व या कंदातील चिकापासून साबुदाणा बनविला जातो. मराठीमध्ये ’साबुदाणा’, हिंदीमध्ये ’साबूदाना’. इंग्रजीमध्ये ’टॅपिओका सँगो’ (Tapioca Sago) असे म्हणतात. केरळात हे गोड कंद मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, ते साधारणत: बटाटा, रताळे याच्यासारखे दिसतात. हे गोड कंद जमिनीच्या खाली मळ्यांमध्ये असतात. साबुदाणा हा पदार्थ साधारणतः अत्यंत चिकट असल्यामुळे पचनासाठी फारच कठीण असतो. उपवास केल्यानंतर जेथे शरीराच्या पचनक्रियेला विश्रांती मिळणे अपेक्षित असते. तेथे अज्ञानामुळे साबुदाणा खाल्ला जाऊन पचनशक्तीचा ताण अजूनच वाढविला जातो.

साबुदाणा बनविण्याची प्रक्रिया – भारतामध्ये तमिळनाडू प्रदेशात साबुदाण्याचे अनेक कारखाने आहेत. शक्करकंद हे प्रथमतः धुऊन त्यांची साल काढली जाते. त्यानंतर त्यातील चोथा बाजूला काढून चिकट अशी पेस्ट बनविली जाते. त्याची साल व चोथा काढल्यामुळे त्यामध्ये असणारी खनिज द्रव्ये, प्रथिने व कंल्शियम नष्ट होतात. ही पेस्ट एका मोठ्या भांड्यात घेऊन 8 ते 12 दिवस आंबविण्यासाठी ठेवली जाते. यामुळे या पेस्टचा चिकटपणा आणखीनच वाढतो. ही पेस्ट पांढरी स्वच्छ दिसण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे ही पेस्ट निःसत्त्व बनते. यानंतर मशीनमधील गोल चाळण्यांना वनस्पती तूप लावले जाते व त्यातून विविध मापाचा गोल आकाराचा साबुदाणा बनविला जातो. साबुदाण्याला कीड लागू नये म्हणून अनेक परिरक्षकांचा (preservatives) वापर केला जातो. परंतु ही परिरक्षके आपल्या शरीरासाठी घातक ठरतात. साबुदाणा पांढराशुभ्र दिसण्यासाठी त्याला पॉलिश केले जाते. पांढराशुभ्र साबुदाणा दिसायला मोत्याप्रमाणे असला, तरी तो केवळ रासायनिक प्रक्रिया केलेला शरीरास घातक असून यातील सर्व कस निघून गेल्यामुळे शरीराचे पोषण होत नाही.

औषधी गुणधर्म – शकरकंदाचे साल व चोथा काढल्याने त्यात असणारी प्रथिने, खनिज द्रव्ये, क्षार जीवनसत्त्वे व कॅल्शियम नष्ट होते, उरतात ती फक्त कर्बोदके. या कर्बोदकामधून शरीरास फक्त उष्मांक मिळतात. साधारणत: शंभर ग्रॅम साबुदाण्यामध्ये चौर्‍याण्णव ग्रॅम कर्बोदके असतात, तर फक्त 0.2 ग्रॅम प्रथिने. 0.5 ग्रॅम तंतू (फायबर), 10 मिलिग्रॅम कॅल्शियम आणि 1.2 ग्रॅम लोह असते. यामध्ये नैसर्गिक जीवनावश्यक मूलद्रव्ये नष्ट झाल्यामुळे शरीराचे पोषण होत नाही. साबुदाणा हा अतिशय चिकट असल्या मुळे आमाशयामध्ये त्याचे लवकर पचन होत नाही. साबुदाणा खाल्लेल्या एखाद्या व्यक्तीची एक तासाने काही कारणास्तव सोनोग्राफी केली असता त्यामध्ये गोल गोल आकाराचा साबुदाणा तसाच दिसून येतो.

(क्रमश:) डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा