मक्याचे कटलेट

साहित्य   –  एक वाटी मक्याचे दाणे, ५-६ फरसबी, एक गाजर, आलं, लसूण, बटाटा, ब्रेडक्रम्स, कॉर्न फ्लोअर, वाटलेली हिरवी मिरची, तेल, मीठ.

कृती     –   मक्याचे दाणे आणि बटाटा उकडून घ्या. गाजर आणि फरसबी अगदी बारीक चिरून घ्या. आता उकडलेला बटाटा, मक्याचे दाणे, गाजर, फरसबी, आलं, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट एकत्र करा. स्वादाप्रमाणे मीठ घाला. त्यात थोडंसं कॉर्न फ्लोअर मिसळा. आता याचे लांबट आकाराचे घट्ट गोळे तयार करा. हे गोळे ब्रेडक्रम्समध्ये घोळून तेलात छान तळून घ्या. तुम्ही ते तव्यावर वांग्याच्या कापांप्रमाणे भाजूनही घेऊ शकता, पण तेल व्यवस्थित लावा. आता हे गरमागरम कटलेट सॉस किंवा पुदीना-कोथिंबिरीच्या चटणीसोबत खाता येतील.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा