काही ब्लॅकमेलर नगरसेवकांमुळे स्मार्ट एलईडी प्रकल्पात ‘खोडा’

महापालिकेने ब्लॅकमेलर लोकांना थारा देऊ नये- पैलवान प्रतिष्ठानची मागणी

(छाया-लहू दळवी,अहमदनगर) 

अहमदनगर- शहरातील सुमारे 60 टक्के पथदिवे बंद असून, सर्वत्र रात्री अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने शहरात स्मार्ट एलईडी प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात येऊन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. तथापि काही विघ्नसंतोषी नगरसेवक या ठेकेदाराला ब्लॅकमेल करत आर्थिक मागणी करत असल्याने महापालिका आयुक्तांनी या विषयात खमकी भूमिका घेऊन ब्लॅकमेलर नगरसेवकांना थारा देऊ नये, अशी मागणी पैलवान प्रतिष्ठानने केली आहे. यासंदर्भात प्रतिष्ठानच्यावतीने बुधवारी (दि. 15) महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ओंकार घोलप, गणेश गोरे, सागर आहेर, कृष्णा भागानगरे, अक्षय बोकडे, रोहित सोनेकर, ऋषीकेश कुसकर, आदित्य फाटक, ओंकार मुदगंटी, शिवम घोलप, शुभम कोमाकूल, हर्षल शिरमाळे, शंकर नरसल, सुशांत राठोड, ओंकार बीडकर, ओम दोन्टा, अजय तडका, भाऊ सरगम, शाहिद सय्यद आदी उपस्थित होते.अहमदनगर शहरात 35 ते 40 हजार लाईटचे पोल आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे जवळपास 60 टक्के पथदिवे बंद आहेत. मागील दीड वर्षात शहरातील बहुतांश भागात अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. अंधाराचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडण्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी महिला, युवती आणि वृद्घांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. त्यातच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. अंधारात खड्डा दिसून न आल्यास अपघात घडत आहेत. या बंद पथदिव्यांच्या प्रश्नावर उपाय शोधत महापालिकेने शहरात स्मार्ट एलईडी बसविण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी ठेकेदाराची नियुक्तीही करण्यात आली आहे.

तथापि या ठेकेदाराला सध्या वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत असून, काही विघ्नसंतोषी लोक या ठेकेदाराकडे पैशाची मागणी करत आहेत. त्यामुळे काम करण्यास इच्छुक नसल्याचे ठेकेदाराने मनपाच्या अधिकार्‍यांना बोलून दाखविले आहे. सदर प्रकल्प तातडीने पूर्णत्वास न्यायचा असेल तर महापालिका आयुक्तांनीच आत खमकी भूमिका घेणे गरजेचे असल्याचे अध्यक्ष यांनी म्हटले आहे. सदर निवेदनात घोलप यांनी म्हटले आहे की, महापालिकेमार्फत स्मार्ट एलईडी प्रकल्पाला प्रशासकीय पातळीवर मान्यता देण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत सुरूआहे, पण काही विघ्नसंतोषी ब्लॅकमेलर लोक या कामासाठी खोडा घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यापूर्वीही या विघ्नसंतोषी लोकांकडून विकासकामांना खोडा घालण्याचे काम झालेले आहे. इतकेच नाही तर त्या कामांच्या प्रशासकीय फाईली हस्तकांमार्फत महानगरपालिका कार्यालयात येऊन स्वतःच्या खाजगी कार्यालयात नेल्या व त्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराला बोलवून आर्थिक मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत स्मार्ट एलईडी बाबत जो काही तक्रारीचा पाढा महानगरपालिकेत सुरू आहे तो विकासकामांना खोडा तर आहेच, पण ठेकेदार या ब्लॅकमेलर नगरसेवकाला न भेटल्याचा गंध सर्व या पत्रव्यवहारात येत आहे. त्यामुळे विकासकामांना खोडा घालणार्‍या ब्लॅकमेलर नगरसेवकांना महानगरपालिकेने थारा देऊ नये.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा