महानगरपालिकेच्या महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ.पुष्पा बोरुडे, उपसभापतीपदी मिना चोपडा यांची बिनविरोध निवड

(छाया- धनेश कटारिया, अहमदनगर)

अहमदनगर- महापालिकेत महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पदासाठीची निवडणूक बुधवारी (दि.15) सकाळी पीठासीन अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झालेला असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले सभापती पदी पुष्पा बोरुडे तर उपसभापती पदी मीना चोपडा यांची बिनविरोध निवड जाहीर केली. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून महिला बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी पुष्पा बोरुडे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यांना सूचक नगरसेविका सुवर्णा गेनप्पा, नगरसेविका सुरेखा कदम व अनुमोदक कमल सप्रे, शांताबाई शिंदे होत्या. राष्ट्रवादीकडून उपसभापती पदासाठी मीना चोपडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, सूचक म्हणून नगरसेविका दीपालीताई बारस्कर व अनुमोदक म्हणून नगरसेविका शोभा बोरकर होत्या.

निवडणूक प्रक्रियेत सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक उमेदवाराचा अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे ही दोन्ही पदे बिनविरोध जाहीर करण्याची औपचारिकता बाकी होती. ती जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बुधवारी (दि.15) पूर्ण केली. निवड जाहीर होताच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळला.मनपा महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. पुष्पा बोरुडे व उपसभापती पदी मिना चोपडा यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी महापौर सुरेखा कदम, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, प्रा.माणिक विधाते, संभाजी कदम, संजय चोपडा, संजय शेंडगे, सुवर्णा गेनप्पा, अनिल बोरुडे, शांता शिंदे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, गणेश कवडे, प्रकाश भागानगरे, संतोष गेनप्पा आदि उपस्थित होते.

महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ – सभापती पुष्पा बोरुडे

आज सर्वांच्या सहकार्याने महिला बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे. या पदाच्या माध्यमातून महिलांचे व बालकांचे प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडविण्याचा आपण प्रयत्न करु. मनपाच्यावतीने शहरातील महिला व बालकांसाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे. महिला व बालकांच्या हक्कासाठी मनपा कटीबद्ध आहोत. गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे अनेक महिलांचा आधार गेल्या आहे तर बालकांच्या डोक्यावरील छत्र हरपले आहे. अशा महिला व बालकांना मदतरुपी आधार देण्याच्या कामास आपले प्राधान्य असेल. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिला व बालकांना मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील. यासाठी महापौर व सर्व नगरसेविकांचे आपणास सहकार्य मिळेल, अशी प्रतिक्रिया नूतन सभापती पुष्पा बोरुडे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी नूतन उपसभापती मिनाताई चोपडा म्हणाल्या, नगरसेविका म्हणून प्रभागाचा सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील आहोत. आता उप सभापतीपदी निवड झाली असून त्या माध्यमातून महिलांच्या अडअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करु. आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या पदाच्या माध्यमातून चांगले काम करुन न्याय देऊ, असे सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा