पाईपलाईन रोडवर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दोघांनी धुमस्टाईलने पळविले

अहमदनगर- घराबाहेर रांगोळी काढत असलेल्या महिलेच्या जवळ पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जावून तिच्या गळ्यातील सव्वा तोळा वजनाचे मंगळसूत्र हिसका मारुन धुमस्टाईलने चोरुन नेल्याची घटना मंगळवारी (दि.14) सकाळी 11.20 च्या सुमारास सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवर असलेल्या सागर हॉटेल समोरील श्रीकृष्णनगर येथे घडली. याबाबत मनकर्णा जालिंदर गोसावी (वय 63, रा.श्रीकृष्णनगर, पाईपलाईनरोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोसावी या सकाळी 11.20 च्या सुमारस घराच्या गेट बाहेर रांगोळी काढत होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या विनाक्रमांकाच्या मोटारसायकलवर दोघे जण त्यांच्या घराजवळ आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने हातातील चिठ्ठी दाखवत पत्ता विचारण्याचा बहाणा केला. त्यावेळी गोसावी यांचे लक्ष विचलीत झाल्याचे पाहून त्याने त्यांच्या गळ्यातील सव्वा तोळे वजनाच्या सोन्याचे गंठण हिसका करुन तोडून नेले व मोटारसायकलवर भरधाव वेगात पसार झाले. याबाबतच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि.क. 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा