डोक्यात काठी मारून वेटरने केला वेटरचा खून

अहमदनगर – हॉटेलमध्ये काम करणार्‍या एका वेटरने केला दुसर्‍या वेटरला लाकडी काठीने हातापायावर डोक्यावर मारहाण करुन जबर जखमी करुन हात पाय दोरीने बांधुन जिवे ठार मारल्याची घटना नगर-जामखेड रोडवर आठवड शिवारातील घाटात हॉटेल सार्थक येथे घडली आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव कैलास घोडके असे नाव आहे. याबाबत समजलेले माहिती अशी की, नगर जामखेड रोडवर आठवड शिवारातील घाटात हॉटेल सार्थक या ठिकाणी मंगळवारी (दि.14) आरोपी संतोष तुळशीरम सुरदुसे (रा. दर्यापुर, ता. दर्यापुर, जि. अमरावती) व मयत कैलास घोडके या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाल्याने यातील आरोपी संतोष याने मयत घोडके याला लाकडी काठीने हातापायावर डोक्यावर मारहाण करुन जबर जखमी केले. यानंतर हात-पाय दोरीने बांधून घोडके याला जिवे ठार मारले. याप्रकरणी संजय नवनाथ खाकाळ यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात भा.दं.वि.कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती समजताच, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके आणि नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. राजेंद्र सानप आणि उपनिरीक्षक चव्हाण, उपनिरीक्षक जारवाल व पोलिस कर्मचार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले व पाहणी केली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा