उजव्या सोंडेचे कडक गणराय – सिद्धटेक

अष्टविनायकातील एक महत्त्वाचे व अहमदनगर जिल्ह्यात असलेले एकमेव स्थान… मधु व कैटभ यार दैत्यांनी ब्रह्मांच्या सृष्टीरचनेत अनेक विघ्नं आणली. ब्रह्मा विष्णूंकडे गेले पण तेथेही त्यांचा पराभव झाला नाही. म्हणून ते शंकराकडे गेले असता शंकर म्हणाले, ‘तुम्ही विनायकाला प्रसन्न करून घेतले असते तर पूर्वीच जय मिळाला असता.’ असे सांगून त्यासाठी षडाक्षरी मंत्र दिला. या मंत्राने विष्णूंना सिद्धी मिळाली म्हणून हे क्षेत्र ‘सिद्धक्षेत्र’ सिद्धटेक आणि विनायकाला ‘सिद्धीविनायक’ नाव पडले.

हे देवालय उत्तराभिमुखी असून विनायकाची मूर्तीची सोंड उजवीकडे झुकल्याने हे दैवत कडक मानतात. जवळच महर्षी व्यासांचे यज्ञ झाल्याने आजही भस्मासम मृत्तिका सापडते. या मंदिराजवळूनच भीमा नदी वाहते. येथे कितीही मोठा पूर आला तरी नदीचा आवाज होत नाही. श्री मोरया गोसावी यांनी येथेच सर्वप्रथम उग्र तपश्चर्या केली होती व नंतर आदेशानुसार मोरगावी गेल्याचे सांगितले जाते. बहुसंख्य नगरकरांनी येते दर्शन घेतलेले असेलच.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा