जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळून व्यावसायिकाची 1 लाखाची रोकड पळविली

अहमदनगर- जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या भिंतीलगत असलेल्या पंचवटी हॉटेल मागील इन केबल नेटवर्कच्या कार्यालयासमोरुन व्यावसायिकाने मोपेड गाडीच्या डिकीत ठेवलेली 1 लाखाची रोकड अज्ञात 2 चोरट्यांनी भरदिवसा पळविल्याची घटना मंगळवारी (दि.14) दुपारी 2 ते 2.15 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत विलास रामभाऊ शिंदे (रा. कायनेटीक चौक) या व्यावसायिकाने भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विलास शिंदे हे कामानिमित्त आपली होंडा ऍक्टीव्हा मोपेड (एम.एच.16, सी.एल.9119) घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालया जवळ असलेल्या हॉटेल पंचवटी मागील परिसरात गेले होते. त्यांनी रस्त्याच्या कडेला मोपेड उभी करुन गेले असता अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांच्या मोपेडच्या डिक्कीचे लॉक तोडून डिक्कीत ठेवलेली 1 लाखाची रोकड घेऊन पोबारा केला. थोड्या वेळात शिंदे हे गाडीजवळ आले असता त्यांना गाडीच्या डिक्कीचे लॉक तुटलेले दिसले. त्यांनी डिक्की तपासली असता रोकड आढळून आली नाही. याबाबत त्यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि.क. 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासले असता दोन युवक एका मोटारसायकलवर या परिसरात संशयीतरित्या फिरताना दिसत असल्याचे आढळून आले आहे. पोलिस या दोघांचा शोध घेत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा