उड्डाणपुलाच्या पोलवर पहिले सेगमेंट ठेवण्याची चाचणी

अहमदनगर – नगरकरांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या उड्डाणपुलाचे काम अहोरात्र चालू असल्याने वेगाने प्रगती पथावर आहे. उड्डाणपूलाचे 83 पोल उभी राहिली आहेत. आता पोल जोडण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. मार्केट यार्ड चौकात मंगळवारी रात्री उशिरा उड्डाणपुलाचे 39 व 40 नंबरचे पोल जोडण्यासाठी पहिले सेगमेंट पोलवर ठेवण्याची चाचणी दोन अजस्त्र क्रेनच्या सहाय्याने यशस्वीपणे करण्यात आली. आज हे पहिले सेगमेंट पोलवर बसवण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवान व पुलाचे काम करणार्‍या संस्थेचे वरिष्ठ इंजिनिअर उपस्थित होते. हे काम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा