श्रीपाद व श्रीकांत छिंदम बंधूंना तोफखाना पोलिसांनी केली अटक

अहमदनगर – अट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेला माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्यासह त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम याना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.नगर शहरातील दिल्लीगेट परिसरामध्ये मागील महिन्यामध्ये एका गाळेधारकांना दमदाटी करून त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रकार छिंदम व त्याच्या साथीदाराने केला होता. या प्रकरणासंदर्भात संबंधित व्यक्तीने त्याच्या साथीदारांना विरोधात येथील तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेपासून वरील आरोपी हे फरार होते. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेला अटकपूर्व जमीन अर्ज खंडपीठाने फेटाळला होता.

गेल्या काही दिवसांपासून छिंदम यांचा शोध पोलीस घेत होते. मंगळवारी (दि.14) रात्रीच्या सुमाराला ते नगर शहरामध्ये आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. या संदर्भामध्ये शहर उप विभागीय अधिकारी विशाल ढुमे व तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी आम्ही या दोघांना अटक केली असून त्यांच्या उर्वरित साथीदारांचा शोध घेत आहोत. तसेच यामध्ये दोन जणांना अटकपूर्व जामीन मिळालेला असून त्यांच्याकडेही या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा