दिवाळीसाठी फटाका विक्री परवाना एक महिना अगोदर ऑनलाईन द्या

फटका व्यापारी असोसिएशनची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

अहमदनगर – दिवाळी सण जवळ आल्याने शहरात फटाके विक्रीचे परवाने लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने द्यावेत, अशी मागणी अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फटाका व्यवसाय हा फक्त दिवाळी सणापुरतीच मर्यादीत असतो. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व फटाका व्यापार्‍यांवर आर्थिक संकट आलेले आहे. दिवाळीच्या कालावधीमध्ये जर हा व्यवसाय झाला नाही तर व्यापार्‍यांवर फार मोठे आर्थिक संकट आढावेल. म्हणून जर फटाके विक्रेत्यांना परवाना एक महिन्या अगोदर दिल्यास शासनाच्या नियमांचे उल्लंघन न होता फटाका खरेदी ग्राहकांना सोयीस्कररित्या व गर्दी न करता करता येईल. जर विक्री परवाने उशिरा मिळाले तर व्यापारी व ग्राहकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागेल. कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेवुन उत्तर प्रदेश सरकारने नुकतेच फटाका विक्री परवाने ऑनलाईन पद्धतीने करत एक महिना अगोदर उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य सरकारने देखील सद्य परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन फटाका विक्री परवाना ऑनलाईन करुन एक महिन्या अगोदर देण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना आदेश द्यावा. यावेळी असोसिएशनचे सहसेक्रेटरी अरविंद साठे, कार्याध्यक्ष सुरेश जाधव, सदस्य सुनील गांधी, संजय सुराणा, अनिल टकले, संतोष तोडकर, उमेश क्षिरसागर आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा