संस्कृती कनोरे विद्यालयात गणेशोत्सवाची सांगता

अहमदनगर – संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेमध्ये पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. गणपती उत्सवामध्ये महिलांच्या व विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक दिवशी पालकांच्या हातून आरती करण्यात आली. पाचव्या दिवशी गणपतीची व सत्यनारायणाची महापूजा करण्यात आली. पूजेसाठी विद्यार्थ्याचे पालक श्री व सौ गवळी यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक गणेश कवडे यांच्या हस्ते गणपतीची आरती होऊन गणपतीचे विसर्जन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना भामरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार दिला. या कार्यक्रमासाठी स्वकुळ साळी हित संवर्धक मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच शालेय समितीचे चेअरमन श्री जितेंद्र लांडगे, संचालक विक्रम पाठक, संजय सागावकर, गणेश अष्टेकर, कृष्णाजी बागडे, विजय जुंदरे हे उपस्थित होते. विद्यार्थी व पालकांचाही या कार्यक्रमात उत्साह दिसून आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री कांबळे, सुशिलकुमार आंधळे, राजेंद्र गर्जे, कु. शुभदा भांबरे, कु. मीनाक्षी पठारे यांनी परिश्रम घेतले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा