बुर्‍हाणनगरला घरफोडी – गुन्हा दाखल

अहमदनगर- अहमदनगर शहराजवळ असलेल्या बुर्‍हाणनगर गावातील संकल्प कॉलनी येथील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील फिलिप्स कंपनीचा स्मार्ट एलईडी टिव्ही चोरुन नेल्याची घटना 5 सप्टेबर ते 14 सप्टेबर रोजी सकाळी 10 या कालावधीत घडली. याबाबत संतोष शिवाजी हरिश्‍चंद्रे यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरिश्‍चंद्रे हे बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरातील एलईडी टिव्ही चोरुन नेला. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि.क. 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा