घरामध्ये सादर केलेला ‘चला सारे, कोरोना थांबवू’ देखावा

अहमदनगर- लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधनासाठी व लोक एकत्र येवून जनजागृती व्हावी या करीता सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.आजच्या कोरोनामय वातावरणात गणेशोत्सवाचे स्वरुप व उद्देश समाज जनजागृतीसाठी झाला पाहिजे. सद्यपरिस्थितीध्ये कोरोना ही महामारी थांबविण्यासाठी नियमांचे पालन व्हावे तसेच प्रत्येकाने लस घेणे आवश्यक आहे या सर्व बाबींची जनजागृती होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने कलाअध्यापक प्रविण साळुंके यांनी घरातील श्री गणेश सजावटीमध्ये ‘चला सारे कोरोना थांबवूया’ या विषयावर देखावा सादर केला आहे. इको फ्रेंडली सजावटीमध्ये टिटेंड पेपरचा वापर करुन मखर तयार करुन माऊंट बोर्डचे कटींग-पेस्टींग करुन त्यास रंगकाम करुन कटआऊटच्या साह्याने देखावा सादर करण्यात आला आहे. अशाच सामाजिक, धार्मिक विषयावर देखावे आपण घरातील श्री गणेश सजावटीमध्ये करू शकतो. त्यातूनच प्रबोधनाबरोबर मुलांच्या कलागुणांना देखील वाव मिळेल.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा