लहुजी शक्ती सेनेची शहरात शनिवारी जिल्हाव्यापी बैठक

अहमदनगर – मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पुकारण्यात येणार्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवार दि.18 सप्टेंबर रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे राज्यातील व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे. बैठकीत लहुजी शक्ती सेनेची नूतन जिल्हा कार्यकारणी जाहीर केली जाणार आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ऍड. हेमंतकुमार खंदारे यांनी केले आहे.

लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या आदेशान्वये या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, यावेळी राज्य संघटक संतोष अहिरे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश खरात, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष देवा कढरे, उत्तर महाराष्ट्र राज्य संघटक जितेंद्र सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये सामाजिक चळवळ गतिमान करण्यासाठी, समाजाच्या निगडित प्रश्‍नांवर भविष्यातील संघटनेच्या वाटचाली काय असतील? याबद्दल सखोल चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी अनेक युवक लहुजी शक्ती सेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. तसेच महत्त्वाच्या पदांचे वाटप देखील राज्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांच्या हस्ते केले जाणार आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा