अहमदनगर होमिओपॅथिक कॉलेज व हॉस्पिटलचा वर्धापनदिन उत्साहात

अहमदनगर- होमिओपॅथीचा प्रचार व प्रसार हे एकमेव उदिष्ठ डोळ्यासमोर ठेऊन अहमदनगर व भोवतालच्या परिसरातील नागरिकांकरिता कै. डॉ. रावसाहेब अनभुले यांच्या मार्गदर्शनाखाली कै. डॉ. अभय चंगेडे, कै. डॉ. विवेक झरकर, कै. डॉ. सदाशिव वाकळे, कै. डॉ. अरुण शित्रे, कै. डॉ. श्रीपती होळकर, कै. डॉ. गजानन मेहेत्रे, कै. डॉ. रविंद्र चव्हाण, कै. मदन क्षत्रिय, तसेच डॉ. डी. एस. पवार,लक्ष्मीनिवास सारडा, डॉ. विलास सोनवणे, राजेद्र बोरा, टी. शिवाजी रणसिंग, अभय मुथ्था यांच्या सहकार्याने 13 सप्टेंबर 1989 रोजी अहमदनगर होमिओपॅथीक शिक्षण संस्थेच्या अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, सावेडी रोड, नगर या होमिओपॅथीक महाविद्यालयास डी.एच.एम.एस. (सी. सी.एच) या अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासन, मुंबई यांची परवानगी मिळाली. 13 सप्टेबर रोजी महाविद्यालयाचा 32 वा वर्धापन दिन अत्यंत साध्या पदधतीने साजरा करण्यात आला. महाविद्यालयास 75 विदयार्थी क्षमतेचे परवानगी असुन बी.एच.एम.एस. हा साडेपाच वर्षाचा अभ्यासक्रम आयुष मंत्रालय नवी दिल्ली, महाराष्ट्र शासन मुंबई व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या परवानगीने चालविला जातो. महाविद्यालयाची सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी भव्य तीन मजली इमारत असुन विद्यार्थी-विद्यार्थीनीनीकरिता राहण्यासाठी स्वतंत्र अशी वसतीगृहाची व्यवस्था व कर्मचार्‍यांसाठी निवासस्थान, खेळण्यासाठी क्रिडांगण व जिमखान्याची सुविधा महाविद्यालयाच्या परिसरातच उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

महाविद्यालयाद्वारे तज्ञ अध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार होमिओपॅथीक शिक्षण दिले जाते व प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्या विविध कला गुणांची जोपासना करण्यासाठी विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. महाविद्यालयाच्या संलग्नित होमिओपॅथीक रुग्णालयामध्ये 25 खाटांची सुसज्ज अशी व्यवस्था असुन 24 तास रुग्णांना सेवा देण्यात येते. रुग्णालयामध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटर, प्रसूतीगृह, क्ष किरण विभाग, सोनोग्राफी विभाग, सुसज्ज लॅब्रोटरी, योगा व निसर्गोपचार केंद्र यासारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात नियमित रुग्ण तपासणी करुन मोफत आठ दिवसाचे होमिओपॅथीक औषध दिले जाते. सर्व रुग्णांची तपासणी महाविद्यालयाच्या अनुभवी, तज्ञ होमिओपॅथीक डॉक्टरांच्याद्वारे केली जाते व आजार बरा होईपर्यंत सर्वांना दर आठ दिवसाला मोफत होमिओपॅथीक औषधे देण्यात येतात त्याचप्रमाणे गरजेनुसार ईसीजी, रक्त, लघवी व सोनोग्राफी व एक्स रे ची तपासणी करुन या तपासण्यांवर 30 टक्के सवलत दिली जाते. सन 2020-21 सालामध्ये 33 व्या वर्षात पदार्पणानिमित्त व भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी आरोग्य शिबीरे, योगोपचाराबद्दल माहिती, आहारविषयी मार्गदर्शन, शालेय विद्यार्थ्याची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य व रुग्णालयीन अधिक्षक डॉ. सुनिल पवार यांनी दिली. अहमदनगर व अहमदनगर परिसरातील सर्व गरजू रुग्णांनी महाविद्यालयाच्या संलग्नित रुग्णालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ.भुषण अनभुले, उपाध्यक्ष भुषण चंगेडे, खजिनदार डॉ. विलास सोनवणे, सचिव डॉ.डी.एस. पवार, सहसचिव लक्ष्मीनिवास सारडा, संचालक बी. बोरा आर. एस., बी. अभय मुथ्था, शिवाजी रणसिंग, डॉ. समीर होळकर, राजेंद्र मेहेत्रे, डॉ. ऋतुजा चव्हाण तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल पवार व आर.एम.ओ. डॉ. मोरे माधुरी यांनी केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा