उपसभापती मीनाताई चोपडा यांनी रुपाली चाकणकर यांचे केले स्वागत

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नगर दौर्‍यात राष्ट्रवादी भवनला भेट देवून पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती मीनाताई चोपडा यांनी चाकणकर यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी जि.प.अध्यक्षा मंजुषा गुंड, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, रेश्माताई आठरे, साहेबान जहागिरदार, अमित खामकर, गजेंद्र भांडवलकर, माजी नगरसेवक संजय चोपडा, प्रकाश पोटे आदी उपस्थित होते. चाकणकर यांनी महिला बालकल्याण समिती उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल चोपडा यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा