मिसाळ परिवाराचे शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान-अरविंद धिरडे

मिसाळ परिवारातर्फे संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेस 1 लाख रुपयांची देणगी

(छाया- अमोल भांबरकर)

अहमदनगर- कै. प्रा. नारायण मिसाळ हे स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे कार्यकारिणी अध्यक्ष होते. साळी समाजातील एक उत्तुंग अष्टपैलू व्यक्तिमत्व, शांत स्वभाव, मितभाषी, सेवाभावी वृत्ती, प्रसन्न हास्याचे धनी, विनोदाची गुंफण, जेष्ठ साहित्यिक, कवी, शिक्षण तज्ञ्, स्पर्धा परीक्षा केंद्राचे द्रोणाचार्य, महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेचे प्रमुख कार्यवाह होते. त्यांच्या सुविध्य पत्नी श्रीमती प्रा. अनुराधा मिसाळ या ’आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार’ प्राप्त आहेत. तसेच कै. प्रा. नारायण मिसाळ यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. मनपाचे स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख म्हणून उत्कृष्ट कार्य त्यांनी केले आहे. मिसाळ परिवाराने शाळेच्या प्रगतीसाठी देणगी दिल्याने स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाच्यावतीने आभार मानले. मिसाळ परिवाराचे शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख अरविंद धिरडे यांनी केले.

श्रीमती प्रा. अनुराधा मिसाळ व मिसाळ परिवाराकडून स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाच्या संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशाला या संस्थेस 1 लाख रुपयांचा धनादेश स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख अरविंद धिरडे यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी डॉ. अभिजित मिसाळ, डॉ. युगधंरा मिसाळ, सौ.आसावरी मिसाळ, प्रिसिपॉल बाळ कांबळे, बार्शीचे श्री. कांबळे तसेच संस्थेचे खजिनदार कृष्णा बागडे, गणेश अष्टेकर, संजय सागांवकर, शिक्षण समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे, विक्रम पाठक, उमेश कोदे, सुनील पावले, विठ्ठल पाठक, सुरेखा शेकटकर, वनिता पाटेकर, छाया साळी, शैला मानकर, शुभदा वल्ली आदींसह स्वकुळसाळी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया साळी यांनी केले तर आभार सुनील पावले यांनी मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा