ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा जिल्हा दौरा

अहमदनगर- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 9.30 वाजता विश्रामगृह पुणे येथून शासकीय मोटारीने श्रीगोंदाकडे प्रयाण. व श्रीगोंदा येथे आगमन. सकाळी 9.30 ते 10.30 वाजता श्रीगोंदा येथे प्राणवायु निर्मिती सयंत्राचे उदघाटन. स्थळ- ग्रामीण रुग्णालय, श्रीगोंदा. सकाळी 10.30 ते 2.30 वाजता श्रीगोंदा येथून मोटारीने तालुका पाथर्डी व तालुका शेवगावकडे प्रयाण व सदर तालुक्यातील अतिवृष्टीने बाधीत गावांचा पाहणी दौरा.

सोईनुसार राखीव व शासकीय विश्रामगृह तालुका पाथर्डी व तालुका शेवगाव. दुपारी 2.30 ते 3.30 वाजता शेवगाव येथून मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण व आगमन. दुपारी 3.30 ते 4 राखीव. स्थळशासकीय विश्रामगृह अहमदनगर. दुपारी 4 ते 6 अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पदाधीकारी समन्वय बैठक. स्थळ- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालय, अहमदनगर. राखीव व मुक्काम स्थळ- शासकीय विश्रामगृह अहमदनगर. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 11 जिल्हा कोरोना उपाययोजना व लसीकरण आढावा बैठक. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर. सकाळी 11 ते 11.30 वाजता पत्रकार परिषद. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर. दुपारी 12 ते 1 वाजता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्हे भोजन योजना शुभारंभ. स्थळ- स्काय ब्रीज, भोसले आखाडा, विनायक नगररोड, अहमदनगर. दुपारी 1 वाजता अहमदनगर येथून शासकीय मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा