हिंदी भाषेला अनमोल महत्त्व-दामोधर बठेजा

सेंट विवेकानंद स्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा

(छाया-अमोल धोपावकर)

अहमदनगर – भारत सुमारे दीडशे वर्षे ब्रिटिशांचा गुलाम राहिला. त्याचा परिणाम बराच काळ दिसून आला. ज्याचा भाषेवरही परिणाम झाला. हिंदी ही जगातील चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. असे असूनही, हिंदीला स्वतःच्या देशात हिंदीला स्थान नव्हते. हिंदी भाषेला अनमोल महत्त्व आहे. हिंदी दिवस साजरे करण्याचा मुख्य हेतू हिंदी वाचवण्याचा प्रयत्न आहे. आपण इंग्रजी शिकले पाहिजे, पण हिंदीचे महत्त्व कमी करून नाही. हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी हिंदी दिवस साजरा केला जातो, असे प्रतिपादन संस्थेचे सचिव दामोधर बठेजा यांनी केले. सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री. बठेजा बोलत होते. याप्रसंगी प्राचार्या गीता तांबे, मुख्याध्यापिका गोादावरी किर्तानी, उपप्राचार्या व हिंदी विभागप्रमुख कांचन पापडेजा, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांबरोबरच सर्व शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी, तसेच विश्‍वस्त रूपचंद मोटवाणी, दामोधर माखिजा, रामशेठ मेंघानी, अमरलाल तलरेजा, महेश मध्यान आदी सहभागी झाले होते.

श्री. बठेजा पुढे म्हणाले की, हिंदी भाषा जगातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांपैकी एक आहे. ही भाषा केवळ भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे. हिंदी भाषेत 11 स्वर व 35 व्यंजन असून, ते देवनागरीत लिहिलेले आहेत. हिंदी ही एकमेव अशी भाषा आहे, जी इतर कोणत्याही भाषेपेक्षा समजण्यास सोपी आहे. हिंदी प्रत्येक भारतीयांना माहित असावी. कारण त्याने आपल्याला जीवनाचे आदर्श शिकवले आहेत. हिंदी भाषेतूनच इतर अनेक भाषांचा विस्तार झाला आहे, असे ते म्हणाले. हिंदी विभागप्रमुख कांचन पापडेजा म्हणाल्या की, हिंदी ही भारत देशात सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. हिंदआर्य भाषा समुहातील हिंदुस्तानी भाषेच्या संस्कृतीकरणामधून हिंदीचा उदय झाला. भारताच्या उत्तर भागातील व मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. सध्या भारताच्या दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान या राज्यांत बहुसंख्य हिंदी भाषिक आहेत. इंग्रजीबरोबरच हिंदी ही भारत सरकारच्या कामकाजाची भाषा आहे. भारतीय राज्य घटनेनुसार सर्व 22 भाषा अधिकृत आहेत. आपला देश समनतेला महत्व देतो. त्यामुळेच सर्व भाषा समान आहेत. हिंदी ला देवनागरी लिपीत लिहितात, असे सांगितले. प्राचार्या गीता तांबे यांनी उदाहरणे देत विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व पटवून दिले. मुख्याध्यापिका गोदावरी किर्तानी यांनी समायोचित मार्गदर्शन केले. यावेळी कनन शेरवानी, अनामिका म्हस्के, तसलीम हकीमजीवाला, मथुरा उपलंची, दिया पुरोहित यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करून हिंदी भाषेचे महत्त्व विशद केले. अनेकांनी कविताही सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमन कदम व शुभांगी पारेख यांनी केले, तर कांचन पापडेजा यांनी आभार मानले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा