कृपापुष्प (भाग – 2)-गैरी मोएड

काही वर्षांपूर्वी इतिहासाची पुनरावृत्ती झाली. यावेळी मी जिल्हा प्रशासकीय नोकरी बदलून माध्यमिक विद्यालय प्राध्यापक पदावर काम करू इच्छित होतो. या पदासाठी मुलाखतीस बरेच इच्छुक उमेदवार आले होते. ज्यांचे पगारसुध्दा माझ्या पेक्षा चांगले जास्त होते. त्याचवेळी मी संत राजिंदरसिंहजी महाराजांच्या सत्संगात सहभागी होण्यास नेपरविले, इलिनोए येथे गेलो होतो. एके सायंकाळी ते आम्हांस प्रभु की इच्छा बनाम स्वेच्छा या विषयावर खुलास्याने समजावत होते आणि यासाठी त्यांनी कारच्या स्वयंचलीत दिशादर्शक यंत्रणा व निर्देशित विज्ञान पद्धतीचे उदाहरण दिले. याविषयी खुलासेवार समजाविताना त्यांनी काही अशा प्रकारे विषद केले की, आमच्यापैकी ज्यांचेकडे स्वयंचलित स्वयननिर्देशित विज्ञान प्रणालीची माहिती सांगितली की त्यातून येणारा आवाज आपणास उजवीकडे वळणारा सांगत असता आपण सरळ जात राहिलो तर तो आवाज वारंवार आपणास योग्य वळण्याचा इशारा देतो, जोपर्यंत आम्ही योग्य मार्गावर वळत नाही तो पर्यंत येत राहतो. आपल्या स्वतःचे मनाचे ही असेच आहे. प्रभू प्रत्येक क्षणास आपल्याबरोबर असतात आणि सतत आम्हास सांभाळत असतात जेणेकरुन आपण योग्य रस्त्यावर यावे. जेव्हा मी परत आले तेव्हा मी प्राध्यापक पदासाठी माझा अर्ज दाखल केला. मला चांगले माहित होते की, माझ्या अगोदर या पदासाठी अनेक इच्छुक उमेदवारांची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. माझी शेवटची मुलाखत होईपर्यंत माझ्या मुलाखती योग्य मार्गावर आहेत किंवा नाही हे कळण्यास माझेकडे कोणताही मार्ग नव्हता.

(कृपाल आश्रम, अहमदनगर) (क्रमशः 80)

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा