आयुर्वेदीय बालसंस्कार बाळाच्या पंचेंद्रियांचा विकास कसा करावा?

1 वर्ष ते 3 वर्ष – या वयातील मुलांच्या पंचेद्रियांचा विकास होऊन मेंदूला चालना मिळण्यासाठी वेगवेगळ्या आकारांची, रंगांची खेळणी बाळाला द्यावी. दिड ते दोन वर्षांची मुलगी, बाहुली, प्राणी, पक्षी अशा खेळण्यांबरोबर जास्त खेळते, तर मुलगा मोटारगाडी, चेंडू, विमान या खेळण्यांबरोबर जास्त खेळतो. या वयातील बाळांना कार्टूनची चित्रे असणारी पुस्तके बघण्यास द्यावीत. या वयातील मुलांना वाचता येत नाही परंतु पुस्तकातील चित्र बघून ते संदर्भ लावू शकतात व आपण बाळाचा मानसिक व बौद्धिक विकास चांगल्या प्रकारे करू शकतो. याबद्दलचे सखोल ङ्काहिती आपण बाळाची खेळणी या प्रकरणात आपण पाहिली आहे. बाळाचे आरोग्य सुदृढ व्हावे व त्याचीे शारीरिक व मानसिक वाढ चांगली व्हावी; म्हणून दुर्वांकुर बालप्राश अर्धा अर्धा चमचा सकाळसंध्याकाळ द्यावा.

3 वर्ष ते 6 वर्ष – या काळात आपण बाळाच्या मेंदूचा विकास जास्तीत जास्त होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, कारण एका शास्त्रज्ञाने म्हटले आहे की बाळाच्या मेंदूचा विकास हा जास्तीतजास्त 6 वर्षांपर्यंत होत असतो; त्यामुळे या वयात जेवढे काही संस्कार केले जातील त्याचा पुढील आयुष्यामध्ये चांगलाच उपयोग होतो. एकदा बाळ सहा वर्षांचे झाल्यानंतर जर आपण संस्कार करण्याचे ठरविले, तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. या वयातील मुलांना शाळेत घालावे. शाळेतील वातावरणामध्ये त्यांचा मानसिक व बौद्धिक विकास हा योग्य प्रकारे होऊ शकतो. या वयातील मुलांना शाळेमध्ये अभ्यासाचे कुठल्याही प्रकारचे दडपण नसावे. फक्त त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हसतखेळत एखादी गोष्ट समजावावी. या काळात त्यांना वाचनाची आवड लागण्यासाठी वेगवेगळी गोष्टीची पुस्तके वाचून दाखवावीत. या वयात मुलांना सायकल चालविणे, मोटारगाडी खेळणे, तसेच बागेमध्ये फिरायला जाणे, बॅटबॉल खेळणे, बुद्धीला चालना देणारे पझल्स गेम खेळणे तसेच बडबड गीते, बालगीते ऐकणे, एखादी गोष्ट ऐकणे या कला फार आवडतात व त्यामध्ये ते चांगलेच रमतात.

(क्रमशः) – डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

कालिका प्राईड, लाल टाकी रोड, अहमदनगर मोबाईल नं- 8793400400 वेळ 9 ते 12

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा