आहारवेद – आहारातून आरोग्य संवर्धन – काय खाणे टाळावे? (पांढरी विषे)

वनस्पती तूप – तुप देखील रक्तवाहिन्यांमध्ये घन स्वरूपात राहते. रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणाला हे तूप चिकटून राहते. त्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत राहण्यास अडथळा निर्माण होतो व पर्यायाने उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयविकार असे आजार जडतात. या वनस्पती तुपामुळे एलडीएल हे खराब कोलेस्टेरॉल वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. म्हणून वनस्पती तूप आहारातून पूर्णपणे वर्ज्य करायलाच हवे. वनस्पती तुपापासून बनविलेले पदार्थ सुद्धा खाऊ नयेत.

उदाहरणार्थ – बिस्किट्स, चॉकलेट्स, नानकटाई, केक, खारी, पाव, ब्रेड हे सर्व पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत. हे तूप पचनास जड असल्यामुळे व शरीरास आत चिकटून राहत असल्यामुळे आम्लपित्त, अपचन, गॅसेस इत्यादी तक्रारी लगेचच सुरू होतात. उपवासाच्या दिवशी खरेतर सात्त्विक फलाहार घेणे गरजेचे असते. परंतु असे न होता जड वनस्पती तूप वापरून वेफर्स, पापड्या यांचे तळण केले जाते. तसेच याच तुपात साबुदाणा खिचडी, वडे केले जातात. असे खाणे शरीरास अतिशय घातक आहे. यापेक्षा उपवास न केलेलाच बरा!

पर्यायी पदार्थ – वनस्पती तुपाऐवजी प्रत्येक पदार्थ शेंगदाणा, करडई, सूर्यफूल, सोयाबीन या नैसर्गिक तेलांमध्ये करावा. उपवासाच्या दिवशी या तुपाऐवजी शेंगदाणा तेल किंवा गायीचे साजूक तूप वापरून पदार्थ बनवावा. गायीचे साजूक तूप हे बुद्धिवर्धक, अग्नी प्रदीप्त करणारे आहे. या तुपामुळे एलडीएल कोलेस्टेरॉल अजिबात वाढत नाही. त्यामुळे रोज दोन चमचे गायीचे तूप जेवणात घ्यावे व वनस्पती तुपाला कायमचेच स्वयंपाकघरातून काढून टाकावे. कारण वनस्पती तुपामुळे अनेक आजारांची लागण होते. उदाहरणार्थ लठ्ठपणा, अति रक्तदाब, हृदयविकार व संधिवात. वनस्पती तूप चमच्याने खाल्ले, तरी घसा लगेचच खवखवायला लागतो, म्हणून आहारात ते कधीच वापरू नये.

(क्रमश:) डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा