सुवालालजी गुंदेचा यांच्या विचारांचा भक्कम पाया जैन ओसवाल पतसंस्थेसाठी अनमोल ठेवा आहे-चेअरमन ईश्वर बोरा

सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे 21 व्या वर्षात पदार्पण

अहमदनगर – सर्वसामान्य व्यावसायिक, व्यापारी यांना पत देऊन अर्थकारणाला चालना देण्याच्या उद्देशाने सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा यांनी लावलेले पतसंस्थेचे रोपटे आज चांगलच बहरले आहे. शिस्तबद्ध व सचोटीचा कारभार आर्थिक संस्थांसाठी महत्वाचा असतो. अशा कारभाराची पायाभरणी गुंदेचा यांनी केली. त्यांच्या विचारांच्या भक्कम पायावर उभी असलेली जैन ओसवाल पतसंस्था आज सर्वत्र नावाजली जाते. दोन दशकांची संस्थेची वाटचाल संचालक, कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार, सभासदांसाठी अभिमानास्पद आहे. सुवालालजी गुंदेचा यांच्या तत्त्वांनुसारच संस्था भविष्यातही कायम अव्वल स्थानी राहिल, असा विश्वास पतसंस्थेचे चेअरमन ईश्वर बोरा यांनी केले. सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेने 20 वर्षे पूर्ण करुन 21 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त संस्थेत संस्थापक संचालक पंडितराव खरपुडे, शांतीलाल गुगळे, विनय भांड यांच्या हस्ते केक कापून संस्थेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी व्हा.चेअरमन किरण शिंगी, मनोज गुंदेचा, सुवर्णा डागा, सी.ए.विशाल गांधी, सरव्यवस्थापक प्रशांत भंडारी, नयना बोगावत, महेंद्र कांबळे, दीपिका जेटला आदी उपस्थित होते. श्री.बोरा पुढे म्हणाले, सुवालालजी यांनी संस्थेला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी कायम प्रयत्न केले. त्यांचा हाच वारसा पुढे नेत संस्थेची स्वमालकीची दिमाखदार वास्तू आता उभी राहत आहे. संस्थेकडे आजमितीस एकूण 65 कोटींच्या ठेवी असून कर्ज वितरण 46 कोटी रुपये इतके आहे. पंडितराव खरपुडे म्हणाले की, सुवालालजी गुंदेचा यांनी या पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली तेव्हापासून संस्थेत संचालक पदाची संधी मिळाली. त्यामुळे त्यांची कार्यपद्धती, शिस्तबद्धता अतिशय जवळून पाहता आली. त्यांना अभिप्रेत असलेला कारभार आताचे पदाधिकारी, संचालक करीत आहेत. त्यामुळेच या पतसंस्थेचा घटक असल्याचा अभिमान वाटतो.

माजी व्हा.चेअरमन राजेंद्र गांधी, माजी संचालक ईश्वर भंडारी (आश्वी), विजय गांधी (नेवासा), रमणलाल मुथा (श्रीरामपूर) यांनीही पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. व्हाईस चेअरमन किरण शिंगी म्हणाले की, सुवालालजी गुंदेचा हे आधुनिक विचारांचे होते. पतसंस्थेच्या ग्राहकांनाही अत्याधुनिक बँकिंग सुविधा मिळाव्यात असा त्यांचा कायम आग्रह असायचा. त्यामुळे 20 वर्षांच्या वाटचालीत संस्थेनं कायम आधुनिक सोयी सुविधा देण्यावर भर दिला आहे. त्याचा लाभ व्यापारी वर्गाला होत असतो. भविष्यात अशीच वाटचाल कायम ठेऊन भाऊंनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होण्यासाठी आम्ही सगळे योगदान देत राहू. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी विविध विषयांवर खेळीमेळीत झालेल्या चर्चेत सभासदांनी संस्थेच्या नेत्रदीपक वाटचालीचे कौतुक करून चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळाची पाठ थोपटली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा