और्ध्वदेहिक संस्कारांचे (अंत्यसंस्कारांचे) महत्त्व!

पुण्याला लक्ष्मी रस्त्यावर एक श्रीमंत गृहस्थ राहत होते; परंतु त्यांना धर्माविषयी आदर नव्हता. त्यांनी अनेक संस्थांना देणग्या दिल्या होत्या. त्यांनी स्वत:च्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले, माझ्या मृत्यूनंतर कोणतेही संस्कार हिंदू पद्धतीने करू नयेत. पुढे ते गृहस्थ वारले. मृत्यूपत्राप्रमाणे त्यांच्या मुलाने त्यांचे और्ध्वदेहिक संस्कार (अंत्यसंस्कार) केले नाहीत. मृत झालेल्या त्या गृहस्थाने ज्या ख्रिस्ती मुलाला स्वत:च्या घरात जागा दिली होती, त्याच्या पत्नीच्या माध्यमातून त्यांनी मी या घराचा मालक आहे. माझ्या मुलाला बोलवा, असे सांगितले. त्यांचा मुलगा मुंबईला होता. तो आल्यावर ते म्हणाले, मी मरून ४ ते ६ मास (महिने) झाले; पण अंत्यसंस्कार न केल्यामुळे माझे अत्यंत हाल होत आहेत. मला अन्नाचे ढीग दिसतात; पण एक कणही पोटात जात नाही. पाण्याचे प्रचंड साठे आहेत; पण थेंबही पाणी पोटात जात नाही. मी एवढ्या संस्थांना देणग्या दिल्या; पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यांच्या मुलाला हे पटले नाही आणि काही न करताच तो परत गेला. पुढे त्या गृहस्थांनी सुनेच्या माध्यमातून हेच सांगितले, तेव्हा मुलाचे डोळे उघडले. त्यानंतर तो मुलगा प. पू. काणे महाराज यांच्याकडे येताच महाराजांनी त्याला सांगितले, अंत्यसंस्कार हे करायलाच हवेत, नाहीतर हाल होतात.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा