जॅम-रोल केक

साहित्य    –  २ अंडी, ४ चमचे मैदा, ४ चमचे साखर, अर्धा चमचा बेकिंग पावडर, जॅम, व्हॅनिला इसेन्स.

कृती      –   अंड्यातील पिवळा भाग व साखर एकत्र करून फेसावे. मैद्यामध्ये बेकिंग पावडर मिसळून मैदा चाळणीने चाळून घ्यावा. त्या मैद्यात अंड्यातील पांढरा भाग, तसेच साखर व पिवळा भाग यांचे फेसून घेतलेले मिश्रण व इसेन्स घालून एकत्र कालवावे. तयार केलले मिश्रण केक पॅनमध्ये पाव इंच जाडीचे होईल, एवढे ओतावे व ओव्हनमध्ये ठेवून भाजून घ्यावे. भाजून झाल्यावर ओल्या फडक्यावर पॅन पालथे घालावे. केक सुटून आल्यावर त्यावर जॅम पसरावा व त्याचा रोल करावा. तो रोल तसाच पाच-दहा मिनिटे ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवावा. नंतर त्याच्या चकत्या कापून, त्या चकत्यांवर खावयास द्यावयाच्या वेळी हवे असल्यास आइस्क्रीम अथवा कस्टर्ड तयार करून घालावे किंवा नुसतेच चेरी घालून डेकोरेशन करावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा