प्राथमिक अवस्थेत वरील उपचार करावेत. बाळाच्या लक्षणांमध्ये फरक न झाल्यास तत्काळ तज्ज्ञ बालचिकित्सकाचा सल्ला व उपचार घ्यावेत. बाळाला अंगावरचे दूध सुरूच ठेवावे. त्यासोबत वरील जलसंजीवनी पण द्यावी. जलसंजीवनी चमचाने थोडी थोडी पण सारखी पाजत राहावी. यामुळे बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे टळू शकते. सहा महिन्यांच्या पुढील बाळाला भाज्यांचे पातळ सूप, भात-वरणाची पेज, तांदूळ आणि मूगडाळ खिचडी, फळांचा रस, कुस्करलेले फळ द्यावे. कमीत कमी दोन वर्षांपर्यंतच्या बालकांना पाणी उकळून गार करून दिले पाहिजे. 2) वरचे गायीचे किंवा शेळीचे दूध देत असताना कमीत कमी 10 मिनिटांपर्यंत उकळून द्यावे. 3) दुध उकळण्यासाठी व पिण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी, बाटली स्वच्छ असा ळीू उकळून घ्यावीत. 4) बालकाच्या मलमूत्राची लवकरात लवकर योग्य विल्हेवाट लावावी. 5) बालकांना हाताळण्यापूर्वी व आहार देण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुऊन घ्यावे.
सरदी, खोकला, टॉन्सिल्सना सूज येणे याम ध्ये ताप येऊ शकतो. तसेच जुलाब. उलट्या यामुळे येणारा ताप, टायफॉईड, मेंदूज्वर, गोवर, कावीळ, कांजिण्या यामध्ये येणारा ताप, थंडी वाजून येणारा ताप उदा. मलेरिया, डेंग्यू, गोचीड ताप, चिकुनगुनिया अशा अनेक आजारांमध्ये ताप येतो.
लक्षणे – अंग गरम होणे, डोके दुखणे, डोळ्यांतून पाणी येणे, अंग दुखणे, अशक्तपणा जाणवणे, किरकिर करणे, अन्न कमी प्रमाणात घेणे किंवा स्तनपान न करणे.
उपचार- लिक्विड-ज्वरमेद किंवा लिक्विड- जीर्णज्वरांतक हे औषध बाळाला 5 मि.लि. दोन ते तीन वेळा द्यावे. तापासोबत सरदी-खोकला असेल, तर सायरप-टेम्पॅनिल हे औषध 5 मि.लि. तीन वेळा द्यावे. या औषधांसोबत बाळाचे अंग गार पाण्याने पुसून घ्यावे. औषधांनी बाळाची लक्षणे कमी न झाल्यास त्वरित बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व उपचार घ्यावा. अनेक वेळा डेंग्यू, मलेरिया, गोचीड ताप, चिकुनगुनिया यांसारख्या आजारांची बालकाला लागण झालेली असते. अशावेळी रक्त-लघवी तपासून डॉक्टर त्या बाबतीत निदान करू शकतात. बाळाला स्तनपान सुरू ठेवावे. सहा महिन्यांच्या पुढील बाळाला वरण-भाताची पेज, भाज्यांचे सूप, त्याच्या इच्छेनुसार फळांचे ज्यूस, नारळ पाणी देत राहावे. खोकला, सुजलेला घसा आणि नाकातून पाणी गळणे हे बहतेक वेळा साध्या घरगुती उपचारानीही बरे होते. परंतु कधीकधी त्यातूनच न्यूमोनिया होऊन आजाराचे स्वरूप गंभीर होत. म्हणून वेळीच या आजाराची लक्षणे जाणून घेतली, तर डॉक्टरांकडे नेमके कधी जायचे हे सर्वांना समजेल.
(क्रमश:) डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे
दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर
अहमदनगर मोबाईल नं- 8793400400 वेळ स. 9 ते 12